सोलापूर पोलीस गुन्हे वृत्त महाराष्ट्र राजकीय सामाजिक मनोरंजन वेब - स्टोरी पर्यावरण / पर्यटन

सोलापूरची जलपरी ‘रीत’ची सुवर्णभरारी!

On: February 1, 2026 6:28 PM
Follow Us:
HTML img Tag Simply Easy Learning

Reet Ankit Dharamsi Swimming Competition News

HTML img Tag Simply Easy Learning

जिल्हास्तरीय स्विमिंग कॉम्पिटिशनमध्ये पटकावले ‘सर्वोत्कृष्ट खेळाडू’ पद

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर : सोलापूर जिल्हा अ‍ॅम्युचर अ‍ॅक्वॅटिक असोसिएशनच्या वतीने आयोजित ‘सोलापूर जिल्हा अ‍ॅक्वॅटिक चॅम्पियनशिप २०२६’ मध्ये के.एल.ई. स्कूलची (KLE School) विद्यार्थिनी रीत अंकित धरमसी हिने आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

१ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या या स्पर्धेत रीतने १० वर्षांखालील वयोगटात तब्बल तीन सुवर्णपदके जिंकून ‘सर्वोत्कृष्ट जलतरणपटू’ (Best Swimmer) हा बहुमान पटकावला.

रीत धरमसी ही के.एल.ई. स्कूलमध्ये इयत्ता चौथीमध्ये शिकत आहे. तिने आपल्या वयोगटातील खालील प्रकारांत प्रथम क्रमांक पटकावला:
५० मीटर फ्री-स्टाईल: प्रथम क्रमांक (सुवर्णपदक)
५० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक: प्रथम क्रमांक (सुवर्णपदक)
५० मीटर फ्री-किक: प्रथम क्रमांक (सुवर्णपदक)

एकाच स्पर्धेत तीनही प्रकारांत सुवर्णपदक मिळवत तिने जिल्ह्याच्या जलतरण क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिच्या या अष्टपैलू कामगिरीबद्दल तिला १० वर्षांखालील वयोगटातील ‘बेस्ट स्वीमर’ या पुरस्काराने गौरवण्यात आले.

तिच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि क्रीडाप्रेमींकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. रीतच्या या यशाने सोलापूरच्या क्रीडा वैभवात मानाचा तुरा रोवला गेला आहे. रीत ही आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक श्रीकांत शेटे यांची विद्यार्थिनी आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe Youtube Channel

Join Now