गुन्हे वृत्त

खतरनाक! पावणे 5 लाखांचा गांजा जप्त

Ganja Karwai Solapur Taluka Police Station Namdev Shinde News

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर : सोलापूर तालुका, पोलीस ठाण्याच्या पथकाने तांदुळवाडी येथे 4 लाख 77 हजार रूपये किंमतीचा 23 कि.लो 850 ग्रॅम गांजा, 20 हजार रूपये किंमतीचा वीवी कंपनीचा मोबाईल हॅन्डसेट, 6 लाख 50 हजार रूपये किंमतीची स्वीप्ट कार असा एकूण 11 लाख 47 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या गुन्ह्यामध्ये एका संशयित आरोपीला अटक केली आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

दिनांक 06.02.2024 रोजी सोलापूर तालुका, पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी पोनि/नामदेव शिंदे, सपोनि/ स्वप्नील ईज्जपवार, सपोनि/ सत्यजित आवटे व पोलीस स्टाफ असे पोलीस ठाणेच्या हद्दीत आगामी लोकसभा निवडणुक -2024 च्या अनुषंगाने फरारी आरोपीची माहिती घेऊन तसेच अंमली पदार्थाची विक्री व वाहतुक करणा-या लोकांची माहिती काढुन रेड करणे करीता पेट्रोलिंग करीत असताना त्यांना मौजे तांदुळवाडी येथील एस. एम.ट्रेडर्स, आडत दुकाना समोर रोडवर एक इसम त्याचे ताब्यातील स्वीप्ट चारचाकी (पाठीमागील काच फुटलेली ) वाहना जवळ संशयितरित्या हालचाल करीत असताना दिसुन आला होता. त्या इसमाकडे काही तरी संशस्यापद वस्तु किंवा अंमली पदार्थ असल्याचा संशय पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना आल्याने ते सर्वजण सरकारी वाहनातुन खाली उतरून त्याचे जवळ जात असताना तो पोलीसांना पाहुन घाबरून पळुन जात असताना त्याचा पाठलाग करून त्यास ताब्यात घेऊन त्याचेकडे विचारपूस करून त्याच्या ताब्यातील स्वीप्ट कारची तपासणी केली असता त्याच्या कारच्या डिक्कीत एका काळया रंगाचे प्लॅस्टिकचे पोते बांधलेल्या अवस्थेत दिसुन आले होते. त्या पोत्याची पाहणी केली असता त्यामध्ये हिरवट, काळसर, फुले व फळे आलेला शेंड असलेला उग्र वास येणारा ओलसर गांजा दिसुन आला तो गांजा असल्याची खात्री झाल्याने स्वीप्ट कारच्या डिक्कीतुन 4 लाख 77 हजार रूपये किंमतीचा 23 कि.लो 850 ग्रॅम गांजा अंमली पदार्थ हस्तगत केला आहे.

सदर ठिकाणाहुन एका इसमास ताब्यात घेतले असून त्याचे सोबत असलेल्या दुसरा इसम पोलीस पथक येण्यापुर्वीच तेथुन निघुन गेला होता. ताब्यात घेतलेल्या इसमाकडुन 4 लाख 77 हजार रूपये किंमतीचा 23 कि.लो 850 ग्रॅम गांजा, 20 हजार रूपये किंमतीचा वीवी कंपनीचा मोबाईल हॅन्डसेट, 6 लाख 50 हजार रूपये किंमतीची स्वीप्ट कार असा एकूण 11 लाख 47 हजार रूपये किंमतीचा मुद्देमालासह अंमली पदार्थ गांजा बेकायदेशीरपणे विक्री करण्याचे उद्देशाने जात असताना त्यास रंगेहाथ पकडले आहे.

याबाबत पोहवा/शरद शिवाजी ढावरे, नेमणुक सोलापूर तालुका, पोलीस ठाणे यांनी अंमली पदार्थ गांजा बेकायदेशीरपणे विक्री करण्याचे उद्देशाने अवैधरित्या आपले कब्जात बाळगलेल्या परिस्थितील मिळुन आले म्हणुन 2 इसमा विरूध्द सोलापूर तालुका, पोलीस ठाणेस दिलेल्या फिर्यादी वरून एन.डी.एस.कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास श्री.स्वप्नील ईज्जपवार, सहायक पोलीस निरीक्षक, सोलापूर तालुका, पोलीस ठाणे हे करीत आहेत.

ही कामगिरी मा.श्री.शिरीष सरदेशपांडे, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, मा.श्री.प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, मा.श्री.संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग सोलापूर यांचे मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री.नामदेव शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील ईज्जपवार, सहायक पोलीस निरीक्षक सत्यजित आवटे, सपोफौ/विवेक सांजेकर, पोहवा/श्रीराम आदलिंग, शरद ढावरे, रहीम सय्यद, चापोहवा/ संतोष लोहार, पोना/लाला राठोड, पोना/असिफ शेख, पोलीस अंमलदार किशोर सलगर व वैभव सुर्यवंशी यांनी बजाविली आहे.

या गुन्ह्यातील आरोपींची नावे आकाश राजकुमार सोनकडे वय 22 रा. सिद्धेश्वर साखर कारखान्या च्या पाठीमागे सोणकडे वस्ती होटगी दक्षिण सोलापूर, आकाश पंडित काळे रा. सिद्धेश्वर साखर कारखाना जवळ कुंभारी रोड वीट भट्टी जवळ सोलापूर अशी आहेत.

Related Articles

Back to top button