गुन्हे वृत्त

वाईट झालं! सहलीला आलेल्या प्रांजलचा सोलापुरात मृत्यू

Pranjal Nitin Maske Beed Solapur School Tour Bad News

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर : गेवराई (जि. बीड) येथील इरा पब्लिक स्कूल या शाळेची सहल सोलापुरात आली होती. पाण्याच्या ठिकाणी खेळत असताना एका 8 वर्षीय विद्यार्थिनीचा उलट्या होवून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

प्रांजल नितीन मस्के (वय 8, रा. गेरवाई जि. बीड) असे मयत विद्यार्थिनीचे नाव आहे. प्रांजलचे वडील नितीन मस्के हे गेरवाई येथे पिग्मी एजंट म्हणून काम करताना. आई गृहिणी आहे. प्रांजल हिला श्रृती नावाची मोठी बहिण आहे.

श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयातील नोंदीनुसार पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेवराई (जि. बीड) येथील इरा पब्लिक स्कूलची सहल दि. 4 फेब्रुवारी 2024 रोजी सोलापुरात आली होती. दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास पाण्यामध्ये खेळत असताना प्रांजल मस्के हिला उलट्या झाल्या.

शाळेचे शिक्षक गणेश क्षीरसागर यांनी तातडीने प्रांजल हिला श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी केली. मात्र प्रांजलीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

या घटनेची माहिती प्रांजल मस्के हिच्या कुटूंबीयांना कळविण्यात आली. या घटनेची नोंद जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात झाली आहे.

प्राजंलचा मृत्यू झाल्यावरच शाळेने आम्हाला कळविले. नेमके काय झाले आहे हे कळाले नाही. मेडीकल रिपोर्ट मिळाल्यावर यासंदर्भात आम्ही तक्रार करणार आहोत.

– अ‍ॅड. सुशीलकुमार उबाळे,
मस्के यांचे नातेवाईक

Related Articles

Back to top button