पत्नीसह कृषी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
kashinath bhajnavale acb crime news solapur
सोलापूर : भ्रष्ट मार्गाने अपसंपदा जमवणारा कृषी सहाय्यक काशिनाथ भजनावळे आणि त्याला मदत करणारी त्याची पत्नी किशोरी भजनावळे या दोघांवर सोलापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे.
भजनावळे आणि त्याच्या पत्नीने आपल्या उत्पन्नापेक्षा जास्त अपसंपदा जमवली असल्याचे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीत समोर आले आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार भजनावळे याच्यावर 2017 साली लाच संदर्भातील कारवाई झाली होती. त्यानंतर चौकशी सुरू करण्यात आली होती. चौकशी अखेर बुधवारी सदर बाजार पोलीस ठाण्यात अपसंपदा जमवल्या संदर्भात नवीन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
2017 साली भजनावळे याच्यावर लाचेची कारवाई झाली तेव्हा कृषी पर्यवेक्षक पदावर कार्यरत होता. सध्या भजनावळे हा करमाळा येथे कृषी पर्यवेक्षक म्हणून कार्यरत आहे.
वाचा अधिक माहिती –