सोलापूर

क्वीन्स क्लब वुमन्स डे पार्टी हाऊसफुल्ल

queens club womens day party

700+ महिलांनी मनसोक्त सेफ वातावरणात केलं एन्जॉय

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर : आज आम्ही वय विसरुन नाचलो, सगळं टेन्शन विसरुन मस्त धमाल केली, सोलापूरात मैत्रिणींबरोबर इतकं सेफली एन्जॉय करता येईल असं वाटलं नव्हतं अशा प्रतिक्रिया मिळाल्या.

HTML img Tag Simply Easy Learning

मयूर क्लासिक एसी बँक्वेट हॉलमध्ये दि. 10 मार्च ला संध्याकाळी 6 ते 9.30 यावेळेत क्वीन्स क्लबने आयोजित केलेल्या वुमन्स डे पार्टीला नेहमीप्रमाणेच अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला.

अनीश सहस्रबुद्धे यांचं अ‍ॅंकरींग आणि निखिल भालेराव यांच्या गाण्यांनी कार्यक्रमाला खूपच रंगत आली. सिनिअर सिटीझन सुद्धा वय विसरुन नाचत होत्या. नवीन जुनी गाणी आणि डी जे च्या गाण्यांवर सर्व वयोगटातील महिलांनी मनसोक्त डान्स केला. छोट्या मुली आणि आज्जी एकत्र डान्स करताना खूप खुश दिसत होत्या. फक्त 99 रुपयात अनलिमिटेड फूड, कोल्डड्रिंक्स आणि भरपूर मजा करता आली असंच सगळ्यांच्या तोंडी होतं.

जाताना प्रत्येकीचं हेच म्हणणं होतं की स्पाईस एन आईस आणि क्वीन्स क्लबने असेच कार्यक्रम आयोजित करावे आणि आम्हाला धमाल करायची संधी द्यावी. क्वीन्स क्लब मेंबर्स म्हणाल्या वर्षभरात अभंगवाणी, गीत रामायण, फ्रेंडशिप डे पार्टी असे अनेक दर्जेदार इव्हेंट्स आम्हाला मिळाले तसेच उत्तम वर्कशॉप आणि स्पर्धेतही भाग घेता आला. स्पाईस एन आईस इव्हेंट्स आणि क्वीन्स क्लबला धन्यवाद आणि शुभेच्छा देऊन अतिशय उत्साहात महिलांनी निरोप घेतला.

Related Articles

Back to top button