गुन्हे वृत्त

गुन्हा दाखल झाल्यावर तासाभरात चोरटे जेरबंद

सदर बझार डीबीची मोठी कामगिरी

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर : दक्षिण सदर बझार परिसरातील विद्या नगरात निवृत्त शिक्षकाचे घर फोडून सहा लाख 77 हजारांचा मुद्देमाल चोरल्याची घटना घडली होती. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर एक तासाच्या आत सदर बझार पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने दोघा सराईत चोरट्यांना जेरबंद केले.

HTML img Tag Simply Easy Learning

रोहित लक्ष्मण बाबावाले (वय 25), विशाल रमेश बाबावाले (वय 27, दोघे रा. काळभैरव मठा जवळ, बापुजी नगर सोलापूर) अशी अटक केलेल्या दोघा चोरट्यांची नावे आहेत. त्यांची दोन दिवसाच्या पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

निवृत्त शिक्षक हारून जलालसाब करकम (वय 74, रा. विदयानगर दक्षिण सदर बझार, सोलापूर) हे गावाला गेले होते. रोहित आणि विशाल या दोघा चोरट्यांनी घर बंद असल्याची संधी साधून 23 एप्रिलला पहाटेच्या सुमारास मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. बेडरूममधील कपाटातून रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण सहा लाख 77 हजारांचा ऐवज चोरुन नेला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर बझार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. रोहित आणि विशाल या दोघांनी चोरी केल्याची माहिती पोलिस नाईक सागर सरतापे यांना समजली. त्यानुसार पोलिसांचे पथक सिध्दार्थ चौकात पोचले. पोलिसांना पाहून रोहित पळून जात होता. पाठलाग करुन दोघांना अटक केली. दोघांकडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण सहा लाख 55 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिस आयुक्त एम राज कुमार, पोलिस उपायुक्त विजय कबाडे, सहायक आयुक्त अजय परमार, सदर बझार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित लकडे, पोलिस निरीक्षक भालचंद्र ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलिस उपनिरीक्षक नितीन शिंदे, पोलिस अंमलदार सागर सरतापे, औदुंबर आटोळे, संतोष मोरे, शहाजहान मुलाणी, राजेश चव्हाण, लक्ष्मीकांत फुटाणे, मल्लू बिराजदार, सागर गुंड, सोमनाथ सुरवसे, अबरार दिंडोरे, हणमंत पुजारी, शोभा कुंभार, नंदू व्हटकर, लक्ष्मण राठोड, इरफान नदाफ यांच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली आहे.

Related Articles

Back to top button