राजकीय
देवेंद्र कोठे भाजपाच्या गळाला!
सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महेश कोठे यांची पुतणे माजी नगरसेवक देवेंद्र कोठे भारतीय जनता पार्टीच्या गळाला लागले आहेत.
देवेंद्र कोठे यांनी भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी शहराध्यक्ष नरेंद्र काळे, रमेश यन्नम यांच्यासह देवेंद्र यांचे सहकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझे पालकत्व स्वीकारले आहे, त्यामुळे मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे, असे देवेंद्र कोठे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
महेश कोठे आणि देवेंद्र कोठे यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. भाजपा प्रवेशाने तो स्पष्टपणे दिसून येत आहे. भारतीय जनता पार्टीला सोलापुरातील कोठे काका-पुतण्याची जोडी फोडण्यात यश आल्याचे बोलले जात आहे.