सोलापूर

‘बार’मध्ये तरुण चेहरे; अध्यक्षपदी अमित आळंगे

सोलापूर : सोलापूर बार असोसिएशनच्या निवडणूकीत अध्यक्षपदी विधी सेवा पॅनलचे प्रमुख अ‍ॅड. अमित आळंगे निवडून आले आहेत. आळंगे यांच्या रुपाने तरुण चेहर्‍याला संधी मिळाली आहे. सचिवपदी विधी व्यासपीठ पॅनलचे मनोज पोमुल विजयी झाले आहेत.

HTML img Tag Simply Easy Learning

बार असोसिएशनच्या निवडणूकीत एकूण 1597 सदस्यांनी मतदान केले होते. शुक्रवारी रात्री उशिरा निकाल जाहीर करण्यात आला. विधी सेवा पॅनलचे तीन तर विधी व्यासपीठ पॅनलचे दोन उमेदवार निवडून आले आहेत. अमित आळंगे हे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे यांचे समर्थक आहेत. बार असोसिएशनमध्ये तरुण चेहऱ्याला मिळालेली संधी पाहता सोलापूर लोकसभेत काँग्रेसला सकारात्मक चित्र निर्माण करेल अशी चर्चा वकिलांमध्ये आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे-
अध्यक्ष : अमित आळंगे 851 , राजेंद्र फताटे 152, एस.व्ही.उजळंबे 581

उपाध्यक्ष : विजय शिंदे 671, जयप्रकाश भंडारे 545, परवेज ढालायत 264, मल्लिनाथ मम्हाणे 95

सचिव : मनोज पामुल 754, लक्ष्मण पाटील 525, शामराव बिराजदार 301

सहसचिव : निदा सैफन 677, मिरा प्रसाद 650, सुवर्णा शिंदे 178, मेघना मलपेद्दी 89

खजिनदार : विनयकुमार कटारे 643, प्रकाश अभंगे 252, संतोष बाराचारे 229, मयप्पा गौडावनरू 43, अब्दुल शेख 421

अध्यक्ष : अमित आळंगे
उपाध्यक्ष : विजय शिंदे
सचिव : मनोज पामुल
सहसचिव : निदा सैफन
खजिनदार : विनयकुमार कटारे

महिला वकिलातील सामना आटीतटीचा व रंगतदार होता. प्रत्येक टप्यावर हरकती घेतल्याने मतमोजणीस विलंब लागला . एकूण मतदार 1831 होते. 87.17%.मतदानाची नोंद झाली होती. सोमवारी 6 मेला अधिकृत निकालाची घोषणा होईल. दुपारी दोन वाजता विशेष सभेतून नूतन पदाधिकाऱ्यांना पदभार सूपुर्त केला जाणार आहे.

मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुरेश गायकवाड , विशेष निवडणूक अधिकारी व्ही.सी.दरगड, सहाय्यक निवडणूक अधिकारी अविनाश काळे, अनिता रणशृंगारे, करण भोसले,सुनिल क्षीरसागर, अविनाश बिराजदार, संदिप शेंडगे,दादा जाधव, अजय रणशृंगारे, शिवाजी कांबळे, मोहन कुरापाटी, योगीराज कलबुर्मे, प्रथमेश शिंदे, युवराज अवताडे, विकास कुलकर्णी, भिमाशंकर कत्ते यांनी काम पाहिले.

Related Articles

Back to top button