राजकीय

हॅट्रिक साधण्याचा निश्चय! राम सातपुते यांना सर्वत्र प्रतिसाद

सोलापूर : सर्वसामान्य कुटुंबातील राजकारणात आलेल्या राम सातपुते यांना सोलापूर लोकसभेचा खासदार करण्यासाठी भारतीय जनता पार्टी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केल्याचे दिसत आहे. नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी राम सातपुते यांनाच मतदान करणार असल्याचे नागरिकांमधून सांगितले जात आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

राम सातपुते यांच्या आई वडिलांनी सोलापूरच्या सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यात मजूर म्हणून काम केले आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून पुढे आलेल्या राम सातपुते यांना सर्वसामान्यांचे प्रश्नांची जाण आहे, त्यामुळे सोलापूरच्या प्रश्नांना तेच न्याय देऊ शकतात अशी आशा सोलापूरकरांमध्ये निर्माण झाली आहे. गेल्या महिन्याभरापासून राम सातपुते यांना सर्वत्र सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत आहे. सर्वच समाज घटकातून बैठका, मिळावे घेऊन नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी राम सातपुते यांना निवडून आणण्याचा निश्चय करण्यात आला आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

भारतीय जनता पार्टी पदाधिकारी, कार्यकर्त्यांसोबतच राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते याही सोलापूर लोकसभा मतदारसंघात फिरून नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी भारतीय जनता पार्टीला मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत. संस्कृती सातपुते यांनाही सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Related Articles

Back to top button