गुन्हे वृत्त

सोलापूरच्या तरुणाला 16 लाखाला गंडवलं!

Real Estate Fraud Crime Solapur Satara News

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर : रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुक करुन सातारा व पुणे येथे चांगला प्लॉट देण्याचे आमिष दाखवून सोलापूरच्या तरुणाची 16 लाख 63 हजारांचा फसवणूक झाली आहे. याप्रकरणी विजापूर नाका पोलिसात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

अविनाश अनिल खलाटे (रा. सरडे रोड, फौजी ढाबा शेजारी, राजळे, ता. फलटण, जि. सातारा) असे आरोपीचे नाव आहे. प्रविण रेवू राठोड (वय 30, रा. सध्या मिलीट्री हॉस्पीटल, मासिंगपुर, सिलचन, राज्य आसाम. कायमचा पत्ता – महालक्ष्मी निवास गट नं. 5. गुरुदेव दत्त नगर, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. 29 नोव्हेंबर 2023 रोजी 29 मार्च 2024 या कालावधीत घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी खलाटे याने फिर्यादी राठोड यांना रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुक करायची आहे. त्यासाठी 20 लाख रुपयांची आवश्यकता आहे. तु मला मदत कर, मी तुला सातारा व पुणे येथे चांगला प्लॉट देतो असे म्हणून विश्‍वास संपादन केला. गुगल पे, फोन पे, तसेच ए.टी.एम मशीनवरुन पैसे ट्रान्सफर करुन घेतले. पैसे देऊनही प्लॉट न दिल्याने राठोड यांनी खलाटे यास वेळोवेळी पैशांची मागणी केली. त्यावर आरोपी खलाटे याने त्याची बहिण सोनाली खलाटे ही रिअल इस्टेटचे काम पाहत असुन तिच्या मार्फत तुला सातारा किंवा पुणे या ठिकाणी चांगला प्लॉट घेऊन देतो असे सांगितले. पैसे देण्यास टाळाटाळ करुन राठोड यांची फसवणुक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Related Articles

Back to top button