गुन्हे वृत्त

Crime News : वाळू तस्कर थेट येरवड्यात!

सोलापूर ग्रामीण हद्दीतील अक्कलकोट व सांगोला तालुक्यातील 02 वाळु तस्कर यांना MPDA अन्वये येरवडा जेलमध्ये केले स्थानबध्द

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर : पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकोट आणि सांगोला तालुक्यातील दोघा वाळू तस्करांवर एम पी डी एफ कायद्यानुसार स्थानबद्धची कारवाई करण्यात आली आहे. वाळू तस्करांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

अतुल वि. कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी अवैधरित्या वाळुतस्करी करणाऱ्या इसमा विरूध्द कार्यवाही करून गुन्हे दाखल करावे तसेच प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्याबाबत आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने सांगोला तालुक्यातील पप्पू शिवाजी इंगोले, रा. कोपटे वस्ती, सांगोला व अक्कलकोट तालुक्यातील अण्णाराव ऊर्फ पिटु बाबुराव पाटील, रा. शेगाव ता. अक्कलकोट, यांचे शरिराविषयक तसेच वाळुचोरीच्या अनुषंगाने गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांना व सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा आणणा-या कृत्यापासुन रोखण्यासाठी मा. श्री. अतुल वि कुलकर्णी, पोलीस अधीक्षक यांच्या मार्फतीने मा. जिल्हादंडाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

स्थानबध्द इसम पप्पु इंगोले यांचे विरूध्द शासकीय लोकसेवक यांना शासकीय काम करताना धाकाने परावृत्त करणे, घातक हत्याराचा वापर करून इच्छापुर्वक दुखापत पोहचवणे, अवैधरित्या वाळू उपसा करणे, शासकीय गोडावून येथून वाळूचे वाहन चोरी करणे याबाबत गंभीर गुन्हे दाखल होते. तसेच स्थानबध्द इसम अण्णाराव पाटील याचे विरूध्द खुनाचा प्रयत्न करणे, अवैधरित्या अग्नशस्त्र बाळगणे, शासकीय लोकसेवक यांना कामापासुन धाकाने परावृत्त करणे, अवैधरित्या वाळू उपसा करणे, बोटीच्या सहयाने वाळ चोरी करणे व इतर, अश्या स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. दोघांना यापूर्वी त्यांच्या वर्तनात सुधारणा होण्यासाठी हद्दपार करण्यात आले होते, तसेच अण्णाराव पाटील वास MPDA कायदयानव्ये स्थानवध्द करण्यात आले होते, तरी देखील पुन्हा पुन्हा गुन्हेगारी कारवाई करुन सर्वसामान्य लोकांमध्ये दहशत व भिती निर्माण केली होती. कृत्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्था बाधीत झाली होती. मा. श्री. कुमार आशिर्वाद, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, सोलापूर यांनी MPDA कायदयान्वये स्थानवच्द करणेबाबत आदेश निर्गमित केले आहे. दोघांना येरवडा कारागृह, पुणे येथे स्थानवच्द करण्यात आले आहे.

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील वाळूतस्करी करणारे व शरिराविषक व मालाविषयक गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणारे तसेच अवैध दारू विक्री करणाऱ्या इसमांचे गुन्हेगारी अभिलेख तयार करण्यात आले असून पोलीस अधीक्षकांनी त्यांचे गुन्हेगारी अभिलेख व वर्तन पाहून सन 2025 मध्ये जिल्ह्यातील 15 इसमाविरूध्द M.P.D.A. कायदयान्वये मा. जिल्हादंडाधिकारी, कार्यालयास प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. यापुढे देखील अश्याच स्वरूपाची प्रभावी कार्यवाही करण्यात येणार आहे.

सदरची कार्यवाही ही मा. श्री. अतुल वि. कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, मा. श्री प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक, यांच्या मार्गदर्शना खाली श्री. विलास यामवार, SDPO अक्कलकोट, श्री. बसवराज शिवपुजे, SDPO मंगळवेढा, व. पोलीस निरीक्षक, संजय जगताप, स.पो.नि. विजय शिंदे, ने. स्थानिक गुन्हे शाखा, पो.नि. सुरेश चिल्लवार, सपोनि सुरवसे, ने. अक्कलकोट दक्षिण, पो.नि. विनोद घुगे, ने. सांगोला पोलीस ठाणे तसेच मा. जिल्हादंडाधिकारी, कार्यालयाकडील श्री. उत्कर्ष देवकुळे, व विलास म्हेत्रे व इतर अधिकारी व अंमलदार यांनी कामकाज केला आहे.

Related Articles

Back to top button