पर्यावरण / पर्यटन

गळ्यात साप घालून व्हिडीओ! अन् मग..

Snake Around Neck Video Taken Forest Department Action

HTML img Tag Simply Easy Learning

गळ्यात साप घालून व्हिडीओ काढला! वनविभागाची कारवाई

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर : समाज माध्यम (इंस्टाग्राम) वर प्रसारीत करण्यात आलेला व्हिडीओमध्ये गळ्यात साप घातलेल्या इम्मासाहब अमिनसाहब नदाफ (रा. माळकवठा, ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर) तसेच व्हिडीओ काढणारा हॉटेल मालक परशुराम मलप्पा सलगरे (रा. कंदलगाव, ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर) यांच्याविरुध्द वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 2 (16), 9, 39. 48, 49, 50 व 51 अंतर्गत वनगुन्हा नोंद करण्यात आला.

दोघांनाही तपासाकरिता ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपीच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर अशा प्रकारचे अजून व्हिडीओ आढळून आले आहेत. त्याबाबत चौकशी सुरु आहे.

वनविभागा समोर आलेला व्हिडीओ हा धामण या प्रजातीच्या सापाचा असून त्याला वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत शेडूल – 1 नुसार अतिउच्च दर्जाचे त्याला संरक्षण देण्यात आले आहे.

ही कारवाई उपवनसंरक्षक कुलराज सिंह, सहाय्यक वनसंरक्षक अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली रोहितकुमार गांगर्डे, वनपरिक्षेत्र अधिकारी (रोहयो) सोलापूर यांच्या नेतृत्वाखाली वनपाल शशिकांत सावंत, रुकेश कांबळे, इरफान काझी, वनरक्षक सुरेश कुर्ले, श्रीशैल पाटील. योगेश जगताप, रमेश कुंभार, रेणुका सोनटक्के, अनिता शिंदे, शुभांगी कोरे, आश्विनी सोनके, नितीन चराटे, हेमंत जाधव, आनंद भडकवाड व वाहन चालक देवराज मुडगो यांनी पार पाडली आहे.

व्हिडिओ काढणे गुन्हा!

अशा प्रकारे सापांसोबत व्हिडीओ काढणे, त्याला हाताळणे तसेच अशा प्रकारे व्हिडीओ समाज माध्यमावरती प्रसारीत करणे हा कायद्याने वनगुन्हा आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने सापांसोबत अशा प्रकारचा व्यवहार करु नये. तसेच आपल्या परिसरात सर्प आढळल्यास सदरीची बातमी वनविभागाला कळवावी तसेच खासगी कोणत्याही व्यक्तींना किंवा स्वतःला सर्प मित्र म्हणणाऱ्या व्यक्तींना हाताळण्याची संधी देवू नये. साप हा नैसर्गिक परिस्वंतेतील अविभाज्य भाग आहे. त्यांचे संरक्षण करणे सर्वांची जबाबदारी आहे. तसेच आपली जबाबदारी पार पाडून वनविभागाला सहकार्य करावे.
– रोहितकुमार गांगर्डे,
वनपरिक्षेत्र अधिकारी, वनविभाग, सोलापूर

Related Articles

Back to top button