वन विभागाच्यावतीने निसर्ग अनुभव उपक्रम
सोलापूर : बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने सोलापूर वनविभागाच्या वतीने निसर्ग अनुभव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवार दि. 23 मे रोजी बुद्ध पौर्णिमा आहे. बुद्ध पौर्णिमेच्या रात्री वनविभागाच्या वतीने सर्वत्र वन्यजीव गणना केली जाते.
सोलापूर वनविभागाच्या वतीने श्री सिद्धेश्वर वनविहार येथे निसर्ग अनुभव हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची वेळ रात्री 9 ते 11 अशी आहे.
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे. होटगी रोडवरील आयकर भवन कार्यालयात जवळील वन विभागाच्या रेंज फॉरेस्ट ऑफिस येथे नाव नोंदणी करता येईल. अधिक माहितीसाठी वन अधिकारी शंकर कुताटे +91 99603 02402 यांच्याशी या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन सोलापूर वन विभागाचे प्रमुख उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील आणि वनपरिक्षेत्र अधिकारी दीपक खलाणे यांनी केले आहे.