चंद्रकांत गुडेवार यांनी मागितली ‘शहर मध्य’ची उमेदवारी!
Chandrakant Gudewar BJP Solapur Central Vidhan Sabha News
परशुराम कोकणे
सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेचे माजी आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी भारतीय जनता पार्टीकडून शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
चंद्रकांत गुडेवार हे डिसेंबर 2023 मध्ये शासकीय सेवेतून निवृत्त झाले आहेत. सोलापुरात दहा वर्षांपूर्वी म्हणजे 2013 ते 2015 या काळात महानगरपालिकेचे आयुक्त होते. आपल्या कणखर भूमिकेने त्यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. सोलापूर महानगरपालिकेला आणि नागरिकांनाही शिस्त लावण्याचा प्रयत्नही त्यांनी केला होता. आयुक्त म्हणून काम करताना ते राजकीय व्यवस्थेचे बळी ठरले. त्यांची बदली झाल्यानंतर सोलापूरकरांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर दिसून आला होता. बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी मोठे जनआंदोलनही झाले होते.
सोलापुरातून त्यांची बदली अमरावती महानगरपालिकेत आयुक्त म्हणून झाली होती. सोलापुरातून बदली झाल्यानंतरही निवृत्त अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांनी सोलापूरकरांशी असलेला संपर्क कमी होऊ दिला नाही. वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांचा कायम सोलापुरात संपर्क आहे. त्यांना मानणारा मोठा जनसमुदाय सोलापुरात आहे.
चंद्रकांत गुडेवार यांची आजवरची शासकीय सेवा –
- भारतीय जनता पार्टीच का?
स्मार्ट सोलापूरकर डिजिटल मीडियाशी बोलताना निवृत्ती अधिकारी चंद्रकांत गुडेवार म्हणाले, ‘माझी आई नगरसेविका म्हणून वसमत येथे कार्यरत होती. त्यामुळे राजकीय वारसा आहे. सोलापुरात आयुक्त म्हणून कार्यरत असताना लोकांमध्ये मिसळून अनेक चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. सोलापुरातील अनेक जणांनी मला शहर मध्य विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्याचे सुचवले आहे. भारतीय जनता पार्टीची विकासाची भूमिका मला पडते. त्यामुळे भारतीय जनता पार्टीकडूनच निवडणूक लढवण्याचा विचार आहे. इतर कोणत्याही पक्षाकडून निवडणूक लढवणार नाही. भारतीय जनता पार्टीने संधी दिल्यास निश्चितपणे सोलापूरला अधिक पुढे नेण्यासाठी काम करेन. उमेदवारी मिळावी यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मेसेज पाठवला आहे. भारतीय जनता पार्टीने सोलापुरातील पदाधिकारी आणि नागरिकांमधून सर्व्हे करून संधी द्यावी.. असे मी म्हटले आहे.’
Devendra fadnavis Solapur
Solapur Bhartiya Janata party
Solapur BJP news
Solapur Chandrakant gudewar news