बापरे.. मोबाईलसाठी घेतला जीव!
Crime News Sadar Bazar Police Station Solapur
सोलापूर : सोलापूर रेल्वे स्थानक परिसर हा भुरट्या चोरट्याचा अड्डा झाला आहे. गेल्या आठवड्यात भुरट्या चोरट्याने मोबाईलसाठी एकाचा जीव घेतला. या खूनाचा उलगडा सदर बझार पोलीसांनी आठ दिवसात केला आहे. मोबाईल चोरीच्या उद्देशाने सराईत चोरट्याने नेमके काय केले? चला वाचूया..
संतोष बाबुराव घुमटे (वय 45, रा. राजेश कोठे नगर, दमाणीनगर जवळ, सोलापूर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणात गणपत उर्फ सुनिल गायकवाड (रा. पटवर्धन चाळ, रामवाडी, सोलापूर) याला अटक करण्यात आली आहे. मयत घुमटे यांचे नवी पेठ परिसरातील मोबाईल गल्लीत घुमटे यांचे मोबाईल कवर, इलेक्ट्रीक साहित्य विक्रीचे दुकान होते. 26 एप्रिलला पहाटेच्या सुमारास त्यांचा खून झाला होता.
घुमटे यांच्या नातेवाईकाचे हैदराबाद येथे लग्न होते. तिथे जाऊन स्वतःला लग्नासाठी मुलगीही शोधायची होती. तसेच दुकानाकरिता काही सामानही आणायचे होते. हैदराबाद येथील काम संपवून घुमटे हे दि. 26 एप्रिलला पहाटेच्या रेल्वेने सोलापुरात आले. घराकडे जाण्यासाठी घुमटे रेल्वे स्थानक परिसरातील सिंमेट गोदामाजवळून पायी निघाले होते. मोकळ्या मैदानात ते शौचाला बसले.
मोबाईल चोरीच्या उद्देशाने सराईत गुन्हेगार गणपत याने घुमटे यांच्यावर पाळत ठेवली होती. अंधारात गणपतने घुमटे यांना लाकडाने डोक्यात व अंगावर मारहाण केली. रक्तस्त्राव होऊन त्यांचा मृत्यू झाला. गणपत मोबाईल घेऊन पसार झाला.
सकाळी साडेसातच्या सुमारास घुमटे यांचा मृतदेह पोलिसांना मिळुन आला होता. मयताचा अंगावर जखमा होत्या. त्यावरुन त्याचा खुन झाल्याचे समजले. पोलिसांनी तपासाला गती देऊन मयताची ओळख पटवली. दरम्यान, गणपतने एका व्यक्तीला मोबाईल विकला होता. त्या व्यक्तीने दुसर्या एका महिलेला मोबाईल विकला होता.
वरिष्ठ अधिकार्यांनी खूनाचा उलगडा करण्याचे आदेश दिले होते. चोरीला गेलेल्या मोबाईलच्या आयएमए क्रमांकावरुन तपास सुरु करण्यात आला. पोलिसांनी 30 ते 40 जणांना संशयावरुन ताब्यात घेतले. रेल्वे स्टेशन परिसरात मोबाईल चोरीचेे गुन्हे करणार्या गणपतलाही पोलिसांना आणले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसी हिसका दाखवल्यानंतर त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.
या पथकाने केली कामगिरी..
पोलिस आयुक्त एम राज कुमार, पोलिस उपायुक्त विजय कबाडे, सहायक आयुक्त अजय परमार, सदर बझार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित लकडे, गुन्हे विभागाचे पोलिस निरीक्षक भालचंद्र ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक सागर काटे, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलिस उपनिरीक्षक नितीन शिंदे, पोलिस अंमलदार अनिता जाधव, औदुंबर आटोळे, संतोष मोरे, शहाजहान मुलाणी, राजेश चव्हाण, अय्याज बागलकोटे, महेश जाधव, सागर सरतापे, लक्ष्मीकांत फुटाणे, अर्जुन गायकवाड, मल्लू बिराजदार, सागर गुंड, सोमनाथ सुरवसे, अबरार दिंडोरे, हणमंत पुजारी, गुणवंत आंगुले, सचिन राऊत, समीर शेतसंदी यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.