पर्यावरण / पर्यटन

कोस्टल कर्नाटकची धमाल टूर!

Eco Friendly Club chadchankar travels coastal karnataka trip

HTML img Tag Simply Easy Learning

चडचणकर ट्रॅव्हल्स आणि इको फ्रेंडली क्लबचा उपक्रम; याना केव्ह, होन्नावर, मुरुडेश्वर, गोकर्ण आणि मिरजान किल्ला याठिकाणी भटकंती

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर : सोलापुरातील निसर्गप्रेमींनी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या कर्नाटक राज्यातील विविध पर्यटनस्थळांना भेटी दिल्या. ही भटकंती इको फ्रेंडली क्लब आणि चडचणकर ट्रॅव्हल्स यांच्यावतीने आयोजित करण्यात आली होती.

भटकंतीच्या पहिल्या दिवशी सर्वजण यल्लापूर याठिकाणी पोचले. यल्लापूर येथील हॉटेल श्रीकृष्ण रेसिडेन्सी या ठिकाणी सर्वजण फ्रेश झाले. चहा नाश्ता झाल्यानंतर त्याच परिसरात असलेल्या श्री दत्त मंदिर आणि श्री त्रिपुर सुंदरी शारदा मंदिरला सर्वांनी भेट दिली.

 

बस प्रवास करत सर्वजण याना केव्ह परिसरात पोहोचले. थोडा पाऊस येऊन गेल्याने वातावरणात गारवा होता. मस्त वातावरणात सर्व निसर्गप्रेमींनी जंगलातून मार्ग काढत याना केव्हला भेट दिली.

Next Trek – काजवा महोत्सव 2025

दाट जंगलाच्या मध्ये असलेल्या आश्चर्यचकित करणाऱ्या उंच उंच दगडांना पाहून सर्व निसर्गप्रेमी खुश झाले. त्यानंतर सर्वांनी याना केव्ह परिसरातल्या मंदिरालाही भेट दिली.

पुन्हा जंगलातून मार्ग गाठत सर्वजण जेवणाच्या ठिकाणी आले. दुपारचे मस्तपैकी जेवण करून सर्व निसर्गप्रेमींचा ताफा मुरुडेश्वरकडे निघाला. मुरुडेश्वर येथील kamath inn murudeshwar येथे मुक्कामाची व्यवस्था होती.

काही निसर्गप्रेमींनी रात्रीच्या प्रकाशात मुर्डेश्वराचे गोपुर आणि मंदिर पाहिले. रात्रीचे जेवण करून सर्वांनी हॉटेलवर मस्त आराम केला.

भटकंतीच्या दुसऱ्या दिवशी सर्वांनी सकाळी चहा नाश्ता केला. त्यानंतर बस प्रवास करत सर्वजण होन्नावरला पोचले. अतिशय निसर्गसंपन्न होन्नावर शरावती नदीच्या किनारी वसलेले आहे.

शरावती नदीच्या पाण्यात सर्वांनी बोटिंगचा आनंद घेतला. त्यानंतर सर्वांनी Sharavathi Mangrove Boardwalk Honnavar या ठिकाणीही भेट दिली.

त्यानंतर सर्वजण होन्नावर परिसरातल्या इको बीचलाही भेट दिली.

बस प्रवास करत पुन्हा सर्वजण हॉटेलवर आले दुपारच्या जेवणानंतर थोडा आराम केला.

पुन्हा सायंकाळी सर्वजण मुरडेश्वराचे मंदिर, गोपूर आणि मोठी शिवमूर्ती पाहण्यासाठी निघाले.

मुरुडेश्वरातील गोपूराच्या विशिष्ट उंचीवरून आसपासचा परिसर पाहून सर्वांना आनंद झाला.

त्यानंतर सर्वांनी मुर्डेश्वर इथल्या म्युझियमला भेट दिली. हॉटेलवर परत येऊन जेवण करून सर्वांनी आराम केला.

भटकंतीच्या तिसऱ्या दिवशी सर्वजण बस प्रवास करत गोकर्णला पोहोचले. गोकर्ण येथील श्री महाबळेश्वर मंदिराला सर्वांनी भेट दिली. सोबतच गोकर्ण बीचवर धमाल केली.

दुपारच्या जेवणानंतर सर्वांनी मिरजान किल्ल्याला भेट दिली. ऐतिहासिक आणि स्वच्छ अशा मिरजान किल्ल्याला भेट देऊन सर्वांना आनंद झाला.

पुन्हा बस प्रवास करत सर्वजण Shri Siddaroodha Swami Matha – Hubballi येथे पोहोचले. दर्शनानंतर रात्रीचे जेवण केले. रात्रभर प्रवास करून सोलापूर गाठले. अनेक आनंदाचे क्षण सोबत घेऊन सर्व निसर्गप्रेमी आपापल्या घरी परतले.

चडचणकर ट्रॅव्हल्सचे संचालक जगदीश चडचणकर आणि सोमनाथ चडचणकर यांच्या मार्गदर्शनाखाली इको फ्रेंडली क्लबचे संस्थापक, वसुंधरा मित्र परशुराम कोकणे, समन्वयक सटवाजी (अजित) कोकणे, संतोषकुमार तडवळ यांनी भटकंतीचे नेतृत्व केले.

या भटकंतीमध्ये प्रेमा काशिनाथ कुंभार, प्रदीप भिकुनाथ गाजरे, राधिका प्रदीप गाजरे , श्रुतिका प्रदीप गाजरे, स्वाती प्रदीप गाजरे, शशिकला गायकवाड, ॲड.साधना पांडुरंग काकडे, मेघा संजय क्षीरसागर, सौरभ संजय क्षीरसागर, स्नेहा सौरभ क्षीरसागर, अस्मय सौरभ क्षीरसागर, महिज्ञा सौरभ क्षीरसागर, नील अमर जेऊरकर, मानसी अमर जेऊरकर, कांबळे धनंजय, शशिकला कांबळे, पोर्णिमा पोलके, सायली पोलके, जयसिंग महादेव जगताप, रोहिणी जयसिंग जगताप, गौरवी जयसिंग जगताप, सुदीक्षा जगताप, हरिदास श्रीरंग मते, रुक्मिणी हरिदास मते, राधिका अरुण जगताप, हार्दिक अरुण जगताप, हृग्वेद अरुण जगताप,
अरुण मधुकर जगताप, डॉ.अश्विनी हनुमंत काळे, डॉ. हनुमंत नामदेव काळे, अर्जुन हनुमंत काळे, शालवी हनुमंत काळे, मनोज अरविंद देशमुख , दिपाली मनोज देशमुख, ब्रह्मदेव श्रीशैल जडगे, ऐश्वर्या ब्रह्मदेव जडगे, गायत्री श्रीकृष्ण माढेकर, राधिका श्रीकृष्ण माढेकर या निसर्गप्रेमींनी सहभाग नोंदवला.

या भटकंतीसाठी चडचणकर ट्रॅव्हल्सचे टूर मॅनेजर बाबूशा त्रिगुळे, चालक समीर मस्के, चालक श्री. पोमाजी, सहाय्यक आतिष तांबे, जेवण विभागाचे प्रमुख श्री. अनिल दादा आणि त्यांच्या टीमचे सहकार्य लाभले.

Related Articles

Back to top button