सुधागड भटकंतीने नववर्षाचे स्वागत!

eco friendly club sudhagad trek

बल्लाळेश्वर गणपती, उन्हेरे आणि किल्ले सुधागडावर भटकंती; इको फ्रेंडली क्लबचा उपक्रम

सोलापूर : नववर्षाचे स्वागत निसर्गाच्या सानिध्यात या संकल्पनेतून किल्ले रायगडाची प्रतिकृती म्हणून ओळख असलेल्या किल्ले सुधागडावर सोलापूरच्या निसर्गप्रेमींनी भटकंती केली.
इको फ्रेंडली क्लबच्यावतीने ४ आणि ५ जानेवारी रोजी निसर्ग भ्रमंतीचे आयोजन करण्यात आले होते. या भटकंतीमध्ये सोलापूरसह पंढरपूर आणि खारघर येथून निसर्गप्रेमींनी सहभाग नोंदवला.
४ जानेवारी रोजी पहाटे सर्व निसर्गप्रेमी पाली परिसरातील पाच्छापूर गावातील निशांत तांबट यांच्या सुधागड भटकंती ट्रेकिंग आणि कॅम्पिंग येथे दाखल झाले. या ठिकाणी सर्वांच्या फ्रेश होण्याची आणि चहा, नाष्ट्याची व्यवस्था करण्यात आली होती.
त्यानंतर बस प्रवास करत सर्वजण पाली परिसरातील उन्हेरे येथे पोचले. सर्वांनी गरम पाण्याचा कुंड पहिला.
त्यानंतर सर्वांनी अष्टविनायक गणपतींपैकी एक असलेल्या पाली येथील बल्लाळेश्वर गणपती बाप्पांचे दर्शन घेतले.
दुपारच्या जेवणानंतर पुन्हा एकदा सर्वजण सुधागड परिसरात पोचले.
मस्तपैकी गावरान जेवणानंतर सर्वांनी सुधागड परिसरातील डोंगरावर छोटीशी भटकंती केली आणि कोंडगाव धरणाला भेट दिली.
रात्रीच्या मुक्कामासाठी सर्व निसर्गप्रेमी पाच्छापूर गावातील निशांत तांबट यांच्या सुधागड ट्रेकिंग आणि कॅम्पिंग येथे दाखल झाले. याठिकाणी टेंटमध्ये मुक्कामाची आणि जेवणाची वावस्था करण्यात आली होती. हुडहुडी थंडीत सर्वांनी मस्त शेकोटीचा आनंद घेतला.
भटकंतीच्या दुसऱ्या दिवशी सर्वजण पहाटे उठून फ्रेश झाले.
स्थानिक गावकरी आणि गाईड विश्वास तांबट काका यांच्या मदतीने सर्वांनी धोंडसे गावातून सुधागडचा ट्रेक सुरु केला. जंगल वाटेतून सकाळच्या फ्रेश वातावरणात ट्रेक करून सर्वजण आनंदून गेले.
Next Trek – Click on image to join WhatsApp Group
https://chat.whatsapp.com/EOKBJJ6wnaXFLr1E9xu5Iq
तीन तासांच्या ट्रेकनंतर सर्वजण महादरवाजा येथे पोचले. किल्ल्यावर पोचल्यानंतर स्थानिक गाईडच्या मदतीने सर्वांनी गडफेरी केली.
सुधागड किल्ल्यावर सर्वांनी दुपारचे जेवणाचा आनंद घेतला. दुपारच्या जेवणानंतर सर्व निसर्गप्रेमी दऱ्यागाव मार्गे सुधागड किल्ला उतरला.
परतीच्या प्रवासात एके ठिकाणी जेवणासाठी थांबून सर्व निसर्गप्रेमी सोमवारी पहाटे सोलापुरात दाखल झाले.
इको फ्रेंडली क्लबचे संस्थापक, वसुंधरा मित्र परशुराम कोकणे, समन्वयक सटवाजी (अजित) कोकणे, संतोषकुमार तडवळ यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर येथून स्मृती बसवराज सातलगाव, श्वेता मलिकार्जुन टाकळे, सुमन कटकधोंड, नरसिंगप्पा बलसुरे, श्वेता बालघर, रिधान नरसिंगप्पा बालसुरे, मनीषा सुभाष कोकाटे, कमल शिवाजी महानूर, ज्ञानेश्वरी शिवाजी महानूर, हर्षवर्धन सचिन दातार, प्रसाद आवारे, विजय टेकाळे, गौरीशंकर नारायणे, पंढरपूर येथून गौरी खिस्ते, स्वाती मोरे, आशा क्षीरसागर आणि खारघर येथून गिरीश घोगले, उमा घोगले, आकाश घोगले, सई घोगले आणि स्पृहा घोगले यांनी सहभाग नोंदवला. विजय टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे संचालक विजय पाटील, चालक गणेश दादा यांचे विशेष सहकार्य लाभले.