विद्या हराळे-लांबतुरे यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्कार

विद्या हराळे-लांबतुरे यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्कार
सोलापूर : आविष्कार सोशल अँड एज्युकेशन फौंडेशनतर्फे शिरवळ, सातारा येथे दि. ५ जानेवारी २०२५ रोजी प्रमुख पाहुणे केनिया देशाचे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन धावपटू सुवर्णपदक विजेते केनिथ किर्तीजी यांच्या शुभहस्ते आणि संजय पवार, संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष, आविष्कार फौंडेशन, सचिव पी.एस. पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सोलापूरातील यमाईदेवी आश्रमशाळेतील शिक्षिका सौ. विद्या हराळे – लांबतुरे यांना “राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्कार” प्रदान करण्यात आला.


यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नितीन भरगुडे पाटील, उपाध्यक्ष जिल्हा परिषद सातारा यांनी भूषविले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती सुनीता केदार यांनी केले.
सौ. विद्या हराळे लांबतुरे ह्या यमाईदेवी आश्रमशाळा, मार्डी, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. सौ. विद्या हराळे – लांबतुरे यांना यापूर्वी सन २०२४ मध्ये “गुणवंत शिक्षिका पुरस्कार” मिळालेला आहे. या कार्यक्रमाप्रसंगी स्वप्नशील लांबतुरे, कामाजी हराळे, छबुताई हराळे, महेश कारंडे आणि शिक्षकवर्ग उपस्थित होते. सौ. विद्या हराळे लांबतुरे यांना मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.