पर्यावरण / पर्यटन

वासोटा, महिमानगड भटकंतीने जंगल अन् इतिहासाचा अनुभव!

वासोटा, महिमानगड भटकंतीने जंगल अन् इतिहासाचा अनुभव!

HTML img Tag Simply Easy Learning

इको फ्रेंडली क्लबचा उपक्रम

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर : निसर्ग पर्यटन वाढावे यासाठी प्रयत्नशील असलेल्या इको फ्रेंडली क्लबच्यावतीने (Eco Friendly Club) वासोटा जंगल ट्रेकिंग (Vasota Junle Trek) आणि किल्ले महिमानगड (Mahimangad Fort) भटकंतीचे आयोजन करण्यात आले होते. निसर्गसंपन्न अशा कोयना परिसरातील शिवसागर जलाशय (Shivsagar) आणि वासोटा परिसरात भटकंतीने सर्वजण आनंदून गेले. या उपक्रमात सोलापूर, पंढरपूर येथून निसर्गप्रेमी सहभागी झाले होते.

8 फेब्रुवारी रोजी सर्व निसर्गप्रेमी चडचणकर ट्रॅव्हल्सच्या (Chadchankar Travels) लक्झरी बसमधुन सातारा येथील निसर्गरम्य अशा कोयना जलाशयाच्या दिशेने रवाना झाले.

9 फेब्रुवारी रोजी पहाटे सर्वजण सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील मौजे शेंबडी या गावामधील किसान साळुंखे यांच्या आरोही टेन्ट हाऊस (Arohi Tent House) याठिकाणी पोचले. पहाटे लवकर सर्वांनी फ्रेश होऊन चहा – नाष्टा केला. सकाळच्या सोनेरी किरणात दिसणारा कोयना जलाशय आणि सह्याद्रीची डोंगररांग पाहून सर्वजण भारावून गेले.

दोन्ही बाजूस असणारी सह्याद्रीची डोंगररांग आणि मध्ये असणाऱ्या शिवसागर जलाशयातून बोटिंग करत वासोटा किल्ल्याकडे सर्वांचा प्रवास सुरु झाला.

बोटीने प्रवास करत असताना उंचचउंच शिखरे आणि शिवसागर जलाशयाचे विस्तीर्ण रूप पाहात निसर्गाचे दर्शन केले. बोटिंग करत वासोटा येथील वनविभागाच्या सह्याद्री व्याघ्र राखीव येथील चेक पोस्टपर्यंत गाठले.

घनदाट असलेल्या कोयना अभ्यारणातून (Koyana koyna Wildlife Sanctuary) वासोटा ट्रेक सुरु झाला.

सुमारे दीड ते दोन जंगलातून ट्रेकिंग करत सर्वजण वासोटा किल्ल्यावर पोचले. वासोटा किल्ल्यावर पोचल्यावर छत्रपती शिवाजी महाराज की जय…, भारत माता की जय.. या घोषणा देत आपला आनंद व्यक्त केला. त्यानंतर सर्वांनी सोबत आणलेला डबा खाल्ला.

दुपारच्या जेवणानंतर सर्वांनी वासोटा किल्ल्याची भटकंती केली. गडाच्या टोकावरून समोर दिसणारे शिवसागर जलाशयाचे विहंगम दृश्य व कोयनेचे अभयारण्य पाहताना सर्वांना आनंद झाला. किल्ल्यावर असलेले मारुती मंदिर, वाड्याचे अवशेष, महादेव मंदिर, नागेश्वर सुळक्याचे दर्शन व दूरवर पसरलेल्या डोंगर-दऱ्या पाहताना वेगळाच आनंद मिळाला.

संपूर्ण किल्ला फिरून झाल्यानंतर सर्वांचा सुरक्षितपणे वासोटा किल्ला उतरून परत बोटीने परतीचा प्रवास सुरु झाला. सायंकाळी शिवसागर जलाशय परिसरात सर्वांनी सूर्यास्ताचा आनंद घेतला.

रात्री जेवणानंतर शिवसागर जलाशयाच्या शेजारी मस्त गाण्याची मैफिल रंगली, सोबतच शेकोटी आणि डान्सही झाला.

10 फेब्रुवारी रोजी सकाळी चहा नाष्टा झाल्यानंतर इको फ्रेंडली क्लबच्या सदस्यांनी आरोही टेन्ट हाऊसचा निरोप घेतला. शेंबडी गावातील दत्त मंदिरास भेट दिल्यानंतर बसने प्रवास करत सर्वजण महिमानगडाकडे निघाले.

दुपारचे जेवण वर्धनगड येथील हॉटेल जय मल्हार येथे झाले. मस्तपैकी गावरान जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर सर्वजण महिमानगड येथे पोचले.

सर्वानी सुरक्षितरित्या महिमानगड ट्रेक केला. दहिवली येथील इतिहास प्रेमी, पुरातत्त्व विभागाचे अभ्यासक आणि महिमानगड फाउंडेशचे संस्थापक हर्षवर्धन गोडसे यांनी किल्ले माहिमनगडाची संपूर्ण ऐतिहासिक माहिती दिली. महिमानगड किल्ल्यावरील मुख्य प्रवेशद्वार, बुरुज, तडबंदी, चोर दरवाजा, पाण्याचे टाके, श्री हनुमान मंदिर, राजवाड्याचे अवशेष याठिकाणी सर्वांनी भेट दिली.

संपूर्ण किल्ला पाहून झाल्यानंतर इको फ्रेंडली क्लबच्या सदस्यांचा सोलापूरच्या दिशेने परतीचा प्रवास सुरु झाला. परतीच्या प्रवासात गोंदवले परिसरातील हॉटेल विराट येथे सर्वांनी रात्रीचे जेवण केले.

ॲक्सिस बँकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सहभाग

इको फ्रेंडली क्लबच्या वासोटा जंगल भटकतीमध्ये ॲक्सिस बँकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. गव्हर्नमेंट व्हॅल्युएटर किशोरी शहा, देवाशीष शहा आणि अक्षया शहा यांच्या मार्गदर्शनाखाली महेश पाटील आणि सहकाऱ्यांनी वासोटा जंगल भटकंती उत्साहाने पूर्ण केली.

इको फ्रेंडली क्लबचे संस्थापक, वसुंधरा मित्र परशुराम कोकणे, देवाशिष शहा, समन्वय सटवाजी (अजित) कोकणे, संतोष तडवळ, महेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या निसर्ग भ्रमंतीमध्ये समीर कलादगी, प्रशांत भोसले, गणेश बेनगिरी, विनोद डोमल, सचिन हसापुरे, रेवण सिद्धापूरे, शुभम आडेकर, स्वप्नील अंबल, श्रद्धा काशीद, समृद्धी ढोले, ओम धुत्तरगावकर, पियुष कटके, रंजना चंदनशिवे, प्रणिता ढगे, नितीन सागर, राहुल मोटे, राकेश डिक्कीत, चेतन भोसले, राजशेखर पोरे, गणेश साठे, अमोल जाधव, जोतिबा जाधव, पांडुरंग चोघुले, महेश काळे, मुरलीधर जन्नू, व्यंकटेश इप्पलपल्ली, नुरुलहसन तांबोळी, महेश बेरे, किरण मोडे, काशिनाथ मोडे, ओंकार कुलकर्णी, योगीनाथ कोरवार, नागेश कटारे, नितीन तलवार, केतन काटकर, रोहित जाधव, विकास वाघचवरे, स्वामी सदाशिव ढोबळे, अभिषेक कोम्पेली, स्वप्नील हराळे, संतोष पाटील, महेश डिक्कीत आदी सदस्य सहभागी झाले होते.

ही निसर्ग भ्रमंती आनंददायी होण्यासाठी चडचणकर ट्रॅव्हल्सचे संचालक सोमनाथ चडचणकर, बस चालक श्री. मस्के, सहाय्यक आतीश तांबे यांचे सहकार्य लाभले.

#EoFriendlyClub #Vasota #VasotaFort #VasotaTrek #Trekking #Maharashtra #MaharashtraTourism #Solapur #Satara #Camping #Boting #JungleTrek

Related Articles

Back to top button