गीत रामायणासाठी हुतात्मा स्मृती मंदिर हाऊसफुल्ल!

सोलापूर : येत्या 22 फेब्रुवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर हुतात्मा स्मृती मंदिर येथे गीत रामायण कार्यक्रमाचे आयोजन स्पाईस एन आईस इव्हेंट्स आणि अनादि केटरर्स यांनी केले होते.


गीत रामायणाचे मुख्य प्रायोजक अनादि केटरर्स आणि स्पाईस एन आईस इव्हेंट्स तसेच उपप्रायोजक होते.
ज्वेलरी पार्टनर – चंदू काका सराफ ज्वेलर्स,मसाले पार्टनर – घरकुल मसाले, मिडीया पार्टनर-दिव्य मराठी, रेडिओ पार्टनर – 95 माय एफएम, कम्युनिकेशन पार्टनर – वेकअप सोलापूर, इलेक्ट्रॉनिक पार्टनर – सुयोग डीजिटल, किचन पार्टनर – सर्वोदय भांडार, मिठाई पार्टनर – चितळे एक्सप्रेस, कन्सल्टन्सी पार्टनर – एएनएस, रियल इस्टेट पार्टनर – वास्तु, सोशल मिडीया पार्टनर – आय लव्ह सोलापूर, अॅक्टीव्हिटी पार्टनर- क्वीन्स क्लब.
श्री. अमित नेसरीकर यांनी आपल्या भावपूर्ण आवाजाने सोलापूरकरांची मने जिंकली. त्यांच्या सर्व साथीदारांनी उत्तम साथसंगत करत भक्तीमय वातावरण निर्माण केलं. श्री. चंद्रशेखर वझे यांनी रामायणातील अनेक माहिती नसलेल्या रंजक गोष्टी निवेदान करताना सांगितल्या. सोलापूरकरांनी ‘स्वये श्रीरामप्रभू ऐकती’ पासून ‘गा बाळांनो श्रीरामायण’ पर्यन्त सर्व गाण्यांना मनापासून दाद दिली.
गायक : अमित नेसरीकर (मुंबई), निवेदन : चंद्रशेखर वझे (मुंबई), तबला : मंदार पुराणिक (मुंबई), व्हायोलिन : राजन माशेलकर (मुंबई), हार्मोनियम : अनिरुद्ध गोसावी (मुंबई), तालवाद्य : प्रवीण साने (मुंबई) यांनी हा कार्यक्रम सादर केला.
सर्व कलाकारांचा आणि स्पॉन्सर्सचा मध्यंतरात स्वरूप सखी भजनीमंडळ, अनादि केटरर्स आणि स्पाईस एन आईस इव्हेंट्सकडून सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी चंदू काका सराफ ज्वेलर्सचे धनंजय माने यांनी 18 जानेवारी रोजी होणाऱ्या शोरुम च्या उद्घाटनाची घोषणा केली आणि सोलापूरकरांना उद्घाटनाचे आग्रहाचे आमंत्रण दिले.
हुतात्मा स्मृति मंदिराच्या प्रांगणात सुद्धा बैठक व्यवस्था करण्यात आली होती तेथील LED स्क्रीनवर 250 पेक्षा जास्त लोकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. भरून पावलो. मनाला मोहिनी घालणारा कार्यक्रम, अयोध्येत गेल्यासारखं वाटलं अशा अनेक प्रतिक्रीया रामभक्तांनी दिल्या. अनीश सरांनी आमच्यासाठी कायमच अशा कार्यक्रमांचं आयोजन करावं अशी मनोकामना सद्गतीत होऊन व्यक्त केली.