सोलापूर

कसे असेल 2024? हिरेहब्बूंनी सांगितली भाकणूक

Siddharameshwar Yatra Solapur Rajshekhar Hirehabbu Bhaknuk

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर : ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेच्या निमित्ताने सोमवारी रात्री होम मैदान परिसरात होमविधीचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर यात्रेचे मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी भाकणूक वर्तवली.

HTML img Tag Simply Easy Learning

यात्रेचे मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी ही भाकणूक वर्तवली आहे. परंपरेप्रमाणे देशमुख यांच्या वासराला दिवसभर उपाशी ठेवण्यात आले होते. सायंकाळी भाकणुकीसाठी या वासराला श्री सिद्धरामेश्वर मंदिर परिसरातील डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहाच्या समोर आणण्यात आले. परंपरेप्रमाणे भाकणुकीचा कार्यक्रम पार पडला.

मानकरी राजशेखर हिरेहब्बू म्हणाले, दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपारिक पद्धतीने यात्रा पार पडली आहे. भाकणुकीच्या सुरुवातीला वासराने मल-मूत्र विसर्जन केले. यामुळे यंदाच्या वर्षी नेहमीप्रमाणे पाऊस पडण्याची शक्यता आहे. भाकणुकीचा कार्यक्रम पार पडत असताना वासरू शांत होते. यावरून यंदा सर्व परिस्थिती शांततेची असण्याची शक्यता आहे. 2023 च्या भाकणुकी वेळी वासरू बिथरले होते. त्यावेळी युद्धाची परिस्थिती निर्माण होईल असे मी सांगितले होते. त्यानुसार इराणमध्ये युद्ध झाल्याचे आपण पाहिले.

भाकणूक दरम्यान कोणत्याही प्रकारच्या राजकीय गोष्टीवर मी भाष्य करत नाही. 2024 शांत असेल. महागाईच्या दृष्टीने हे वर्ष स्थिर राहील असा अंदाज आहे, असेही मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button