हिंदू रणरागिणी माधवी लता यांची उद्या धडाडणार तोफ


Madhavi lata BJP Sabha in Solapur

देवेंद्र कोठे यांच्या प्रचारार्थ सभा : उपस्थित राहण्याचे आवाहन
सोलापूर : शहर मध्य विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांच्या प्रचारार्थ प्रखर हिंदुत्ववादी नेत्या माधवी लता यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. रविवारी सायंकाळी सहा वाजता जुना कुंभारी रस्त्यावरील ७० फूट रस्त्याजवळील माधव नगर पटांगण येथील पद्म मारुती मंदिरासमोर ही सभा होणार आहे.
लोकसभा निवडणुकीत हैदराबाद येथून भाजपाच्या उमेदवार राहिलेल्या माधवी लता यांनी एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात लढत दिल्याने चर्चेत आल्या होत्या. या लढतीमुळे हैदराबाद येथील निवडणुकीची चर्चा संपूर्ण देशभरात झाली होती.
भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय (ए) आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांनी शहर मध्य विधानसभा मतदारसंघात प्रचाराचा धडाका लावला आहे. पदयात्रा, बैठका, होम टू होम प्रचार, कॉर्नर बैठका या माध्यमातून देवेंद्र कोठे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. हिंदुत्ववादी नागरिकांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेल्या माधवी लता जाहीर सभेत काय बोलणार याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे. या सभेस सोलापूरकरांनी प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजपा आणि महायुतीने केले आहे.