गुन्हे वृत्त

रविंदरजी एक मुसिबत मे फँस गया हूँ..

Ravindra Chincholkar Solapur Online Fraud News Cyber Crime

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर : ऑनलाइन माध्यमातून फसवणुकीचे प्रकार आता नवीन राहिले नाहीत. ऑनलाइन माध्यमातून लोकांना फसवून बँक खात्यातून पैसे काढून घेणाऱ्या गुन्हेगारांनी आता नवनवीन आयडिया वापरायला सुरुवात केली आहे. ज्येष्ठ पत्रकार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाचे निवृत्त विभाग प्रमुख प्रा. डॉ. रवींद्र चिंचोलकर हे ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या गुन्हेगारांच्या तावडीतून थोडक्यात बचावले आहेत.

HTML img Tag Simply Easy Learning

प्रा. रवींद्र चिंचोलकर यांना शंका आल्यानंतर त्यांनी सावध भूमिका घेतली. त्यामुळेच ते बचावले. या घटनेतून सर्वांनी बोध घ्यावा यासाठी प्रा. चिंचोलकर यांनी घडलेली घटना सर्वांसोबत शेअर केली आहे.

काय घडले नेमके? वाचा प्रा. रविंद्र चिंचोलकर यांच्या शब्दात-

बचावलो..

काल प्रवासात असताना अचानक फोन आला ‘हॅलो रवींदरजी कैसे हो, पहचाना मुझे’. मी विचार करू लागलो तोवर तो पुढे म्हणाला ‘ मै शर्मा बोल रहा हूँ”. दिल्लीतील दोन -तीन शर्मा ओळखीचे आहेत, त्यापैकी हा कोणी असावा याचा मी विचार करत होतो . मला विचार करायला उसंत न देता तो म्हणाला’ रविंदरजी एक मुसिबत मे फँस गया हूँ, आपही मेरी सहायता कर सकते हो. नाशिक की एक फर्म मे मेरा पेमेंट अटक गया है, मेरे फोन पर पैसा ट्रान्स्फर नही हो रहा; आपके फोनपर 40 हजार रुपये ट्रान्सफर करनो को उनको बोला है ।”. मी त्याला म्हणत होतो, “मी नाही काही मदत करू शकणार, मी प्रवासात आहे आणि माझ्याकडे पैसे का पाठवता ?”. हे सांगेपर्यंत . पेटीएम द्वारे 40 हजार पाठविल्याचा संदेश मला आला.

शर्मा म्हणाला “रवींदरजी आप पर मेरा पूरा भरोसा है, देखो 40 हजार आपको ट्रान्स्फर हुआ है । मुझे हॉस्पिटल का बिल अर्जंट पेड करना है, मै आपको हॉस्पिटलका नंबर देता हूँ । उसपर तुरंत 5 हजार रुपये भेज देना ।”

तो मला विचार करायला वेळच मिळू देत नव्हता . तरीही मी माझ्या मुलाला फोन करून शर्माचा आणि त्याने दिलेला दुसरा मोबाईल क्रमांक तपासण्यास सांगितले . मुलगा म्हणाला एका नंबरवर दुसरेच नाव येत आहे , दुसऱ्यावर काहीच नाव येत नाही . फसवणुकीचा प्रकार दिसतोय, तुम्ही बँक अकाउंट चेक करा, पैसे जमा झालेले नसतील “.

मी बँक अकाउंट तपासले, खरेच त्यात एकही रुपया जमा झालेला नव्हता . शर्माचे सतत फोन येत होते . शेवटी त्याला मी सांगितले मला पैसे आलेले नाहीत, हा सारा फसवणुकीचा प्रकार आहे. मी काहीही मदत करणार नाही ‘.

त्यावर त्या तथाकथित शर्माने ‘ठीक है मे देखता हूँ’ असे म्हणत फोन बंद केला .

तो मोबाईल क्रमांक मी लगेच ब्लॉक केला . हे आपल्या कोणाच्याही बाबतीत घडू शकते.

– रवींद्र चिंचोलकर,

निवृत्त मास कम्युनिकेशन विभाग प्रमुख,

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

Related Articles

Back to top button