गुन्हे वृत्त

‘शेअर मार्केट’च्या नावानं गंडवलं! नो प्रॉफिट, टोटल चीटिंग..

सोलापूर : शेअर मार्केट व्यवसाय करण्याकरीता विश्वास संपादन करून १७ लाख ८५ हजार रुपये वेगवेगळ्या खात्यावर जमा करून अनिल शर्मा आणि आशिष शहा या जोडगोळीने सोलापुरातील टॉवेल व्यापाराची फसवणूक केली.

HTML img Tag Simply Easy Learning

हा प्रकार ०१ ते १५ नोव्हेंबर २०२३ रोजी दरम्यान वेळोवेळी घडला आहे. शेअर मार्केट व्यवसायात गुंतवणूक केल्यानंतर त्याचा कोणताही प्रॉफिट व मूळ रक्कम परत न मिळता, टोटल चीटिंग झाल्याने व्यापारी गोपाल दत्तात्रय मिठ्ठा यांनी पोलीस आयुक्तालयाच्या सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, या गुन्ह्यातील आरोपी अनिल शर्मा आणि आशिष शहा या दोघांनी शेअर मार्केट ट्रेडिंग संदर्भात व्हाट्सअप ग्रुप तयार केला. फेसबुकच्या माध्यमातून शेअर मार्केट ट्रेडिंग संदर्भातील माहिती सोलापूरच्या न्यु पाच्छा पेठ, कुचन नगरातील रहिवासी गोपाल दत्तात्रय मिठ्ठा (वय-४० वर्षे) यांना माहिती मिळाली.

आरोपींनी शेअर मार्केट ट्रेडींग व्हॉटस अॅप ग्रुपमध्ये वेगवेगळे मोबाईल क्रमांक अॅड करून त्याव्दारे संपर्कात आलेल्या गोपाल मिठ्ठा यांचा व्यवसायिक विश्वास संपादन करून त्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन केले.

त्या आवाहनाला गोपाल मिट्टा यांनी प्रतिसाद देण्यापूर्वी त्यांच्या मोबाईलवर एक लिंक पाठविली. त्यावर गोपाल मिट्टा यांना प्रायमरी अकाऊंट ओपन करण्यास सांगून फिर्यादी यांच्यकडून वेगवेगळ्या खात्यावर रक्कम जमा करून घेतली. तसेच कंपनीच्या चार्टमध्ये फिर्यादी मिठ्ठा यांच्याकडून वेगवेगळ्या खात्यावर रक्कम जमा करून घेतली तसेच वेळोवेळी त्या अकाऊंटवर कंपनीचा चार्टमध्ये फिर्यादी यांनी खरेदी केलेल्या शेअर्स व आयपीओ च्या किंमती वाढल्याचे प्रकाशीत केले.

मात्र कसलाही प्रॉफिट मिळून दिलेले नाही. तसेच मिठ्ठा यांनी जमा केलेली मूळ रक्कम १७,८५,००० रूपये इतकी परत केली नाही. शेअर मार्केट मधील गुंतवणुकीच्या नावाखाली आपली टोटल चीटिंग झाली आहे, हे लक्षात आल्यावर गोपाल मिठ्ठा यांनी पोलीस आयुक्तालयाकडील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली‌ आहे. त्यानुसार अनिल शर्मा, आशिष शहा यांच्याविरुद्ध भादवि ४२०,४१९,३४ सह आय टी अॅक्ट ६६ सी, ६६ डी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला‌ आहे. सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीशैल गजा या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.

Related Articles

Back to top button