सोलापूर नाही ओ शोलापूर!
पद्माकर कुलकर्णी
सोलापूर : राज्यात मे महिन्याच्या सुरुवातीलाच सूर्य आग ओकत असून तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सोलापूरसह राज्यात तापमानाचा पारा वाढतच चालला आहे. आज रविवार 5 मे रोजी शोलापुरात 44.4 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद सोलापुरात झाली आहे.
सोमवारी 30 एप्रिल रोजी सोलापूरचे तापमान सर्वाधिक म्हणजे 44 अंश सेल्सिअस इतके होते. रविवारी सोलापूरकरांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागला. राज्यामध्ये तापमानाचा पारा रविवारी चढा होता. सोलापुरातही रविवारी कमाल तापमानाचा पारा 43.7 अंश सेल्सिअस असल्याची नोंद झाली होती.
सोलापुरात सलग दोन दिवस 44 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान असल्याने एप्रिलमधील उष्णतेची ही दुसरी लाट होती.
गेल्या 13 ते 14 दिवसापासून सोलापूरचे तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर आहे. मे महिन्यातही असेच वातावरण असू शकेल, असाही अंदाज हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आला आहे.