सोलापूर तापतंय; आजचे तापमान 43+
सोलापूर : शहर व परिसरात उन्हाची तीव्रता वाढली असून या हंगामातील आतापर्यंतचे उच्चांकी कमाल तापमान आज 43.1 अंश सेल्सिअस नोंदले गेले.
सरासरीच्या तुलनेत चार अंशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे दुपारी उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. त्यामुळे रस्त्यावर शांतता दिसून येत आहे.
या एप्रिल महिन्यात आतापर्यंत ४१ ते ४२ अंशापर्यंत तापमानाची नोंद झाली होती. आता पारा ४३ अंशाच्या पुढे गेला असून हा आतापर्यंतचा उच्चांक ठरला आहे. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता जाणवू लागली आहे. सोलापूरसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तापमानात वाढ होत असल्याचे दिसून येते. पुणे वेधशाळेने वर्तविलेल्या अंदाजानुसार, या आठवड्याच्या अखेरीस या भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
गेल्या वर्षी ५ एप्रिल २०२३ रोजी ४०.३ अंश इतके तापमान नोंदले गेले होते. परंतु आज हे तापमान ३.१ एक अंशाने म्हणजेच ४३.१ वाढले आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.