भारीच की! ‘स्टार्टअप’साठी मिळणार 15 लाखांपर्यंत निधी
सोलापूर : नावीन्य आणि नवसंकल्पनाना प्रोत्साहन देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या उद्यम इन्क्युबेशन केंद्रामार्फत आयडिया हॅकथॉन इन्कुबेशन प्रोग्राम आयोजित केले आहे. यासाठी १० फेब्रुवारी पर्यंत नावनोंदणी मुदत आहे.
ही स्पर्धा नवसंकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी खास राबवली जाणार असून यामध्ये विदयार्थी विद्यार्थिनी, उद्योजक आणि इतर सर्व या श्रेणीमध्ये अर्ज करता येणार आहे. या संकल्पनांना उत्पादनामध्ये रूपांतरित करण्याकरिता १५ लाखापर्यंत मदत मिळणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक प्रा. डॉ. विकास पाटील यांनी दिली.
अधिक माहितीसाठी संपर्क साधा –
विद्यापीठाच्या उद्यम इंक्युबेशन केंद्राने आतापर्यंत स्किलथॉन, आयडियाथॉन, सोलापूर स्टार्टप यात्रा, महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा, अशा विविध स्पर्धांचे आयोजन करत १०,००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आतापर्यंत २५ नवउद्योजकांची निवड करून विद्यापीठात नोंदणी झालेली आहे. या स्पर्धेचा मान विद्यापीठ आणि इंक्युबेशन केंद्राला मिळत आहे. अधिक माहितीसाठी श्रीनिवास नलगेशी कौशल्य विकास व्यवस्थापक (७०८०२०२०५५/५६) यांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
होतकरू ते उद्योजक नवसंकल्पना सादर करू शकतील, १० फेब्रुवारी २०२४ कल्पना पाठवा, विद्यापीठास आयोजनाचा बहुमान
ऑनलाइन पद्धतीने अर्ज
ऑनलाइन अर्ज करताना होस्ट इन्स्टिट्यूट म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर निवडण्याकरिता फॉर्म भरतेवेळी प्रोजेक्ट कोड G0261 समाविष्ट करणे आवश्यक असेल, उर्जा, आरोग्य, सेवा क्षेत्र, कृषी क्षेत्र किंवा इतर क्षेत्रांमध्ये देखील अर्ज करता येईल.
Link – https://parivartan.accubate.app/ext/form/1747/1/apply
या लिंक द्वारा इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात.
कोणत्याही उमेवाराला सहभागास मुभा
आपल्या संकल्पनेनुसार नवे स्टार्टअप सुरू करू शकतील. कोणतीही महिला, पुरुष विद्यार्थी किंवा एमएसएमई (सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग) यात सहभागी होऊ शकतात. तसेच कृषी क्षेत्र, आरोग्य क्षेत्र, सेवा क्षेत्र, ऊर्जा क्षेत्र आणि इतर विविध क्षेत्रे त्यांच्या कल्पनांचे प्रस्ताव पाठवू शकतात. कल्पनेमध्ये मार्केटिंग आणि ब्रडिंग, आयडिया, टेक्नॉलॉजी, सोशल इनोव्हेशन इत्यादींशी संबंधित नावीन्य असावे. यासोबतच आपला व्यवसाय कसा पुढे नेता येईल, याचीही योजना असावी.