अल्पवयीन मुलाकडे सापडले पिस्तूल!
Solapur Crime Branch Pistul News
सोलापूर : देशी गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.
गुन्हे शाखेचे सपोनि संजय क्षिरसागर व त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार यांना सोलापूर शहर हद्दीत रात्रगस्ती दरम्यान गोपनीय बातमीदार मार्फत माहीती मिळाली की, एका इसमाकडे देशी बनावटीचे गावठी पिस्तूल असून तो सध्या सिध्दारूढ मठ, गवळी वस्ती, सोलापूर या ठिकाणी थांबला आहे.
सपोनि संजय क्षिरसागर व त्यांचे तपास पथक हे मिळालेल्या बातमीप्रमाणे नमुद ठिकाणी गेले. तेथे त्यांना बातमीतील वर्णनाप्रमाणे एक इसम मिळुन आला. त्याच्याकडे सोपोनि संजय क्षिरसागर व तपास पथकाने चौकशी केली. तो अल्पवयीन बालक असल्याचे दिसुन आले. अल्पवयीन बालकाची चौकशी केली. त्यामध्ये अल्पवयीन बालकाने दोन महिन्यापूर्वी नाशिक येथे राहणारा अभिजीत शाम पवार याच्या मार्फतीने प्रशांत अशोक जाधव रा. नाशिक याच्याकडुन एक गावठी पिस्तुल ३०,०००/-रू मध्ये खरेदी केले होते. नमूद गावठी पिस्तुल हे अल्पवयीन बालकाने त्याचा मित्र प्रथमेश व्यंकटेश करणकोट (वय-२३ वर्ष, व्यवसाय व्यापार, रा. शरण बसवेश्वर नगर, गवळी वस्ती, सोलापूर) यास 34,000 मध्ये विक्री केले असून सध्या ते गावठी पिस्तुल प्रथमेश व्यंकटेश करणकोट याने स्वतःच्या ताब्यात ठेवले असल्याची माहीती सांगितली.
निष्पन्न माहिती वरून इसम नामे प्रथमेश व्यंकटेश करणकोट यास, शरण बसवेश्वर नगर, गवळी वस्ती, सोलापूर याच्या ताब्यातुन, एक देशी बनावटीचे ३५,०००/-रू किंमतीचे गावठी पिस्तुल जप्त केले आहे. याबाबत एम.आय.डी.सी पोलीस ठाणे, सोलापूर शहर येथे भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे करीत आहे.
ही कामगिरी राजेंद्र माने, पोलीस आयुक्त, सोलापूर शहर, डॉ. दीपाली काळे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्रीमती प्रांजली सोनवणे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे, सुनिल दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि./संजय क्षिरसागर, अनिल जाधव, महेश शिंदे, राजु मुदगल, कुमार शेळके, सिध्दाराम देशमुख, अजय गुंड, प्रकाश गायकवाड, अविनाश पाटील चालक सतिश काटे यांनी केली आहे.