राजकीय

भाजपा शहराध्यक्षांचा निषेध! कशासाठी? वाचा..

BJP Solapur Narendra Kale Vishal Gaikwad News

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर (परशुराम कोकणे) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर दौऱ्याच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले.

HTML img Tag Simply Easy Learning

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह इतर नेतेही सोलापुरात आले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा जवळून पाहण्यासाठी काही पदाधिकाऱ्यांना व्हीआयपी पास मिळाले तर काहींना सर्वसामान्य नागरिकांच्या सेक्टरमध्ये बसून भाषण ऐकावे लागले. व्हीआयपी सेक्टरमधील पास न मिळालेले भारतीय जनता पार्टीचे सोलापूर शहर सरचिटणीस विशाल गायकवाड यांनी शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

शहराध्यक्ष नरेंद्र काळे हे पूर्वी आमदार सुभाष देशमुख यांचे समर्थक होते. सध्या ते आमदार विजयकुमार देशमुख यांच्या जवळ आहेत. विशाल गायकवाड हे सरचिटणीस असले तरी आमदार सुभाष देशमुख गटाचे आहेत. त्यामुळेच त्यांना आणि इतर काही पदाधिकाऱ्यांना पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमाचे पास देण्यात आले नसल्याची चर्चा आहे.

सरचिटणीस विशाल गायकवाड यांनी फेसबुकच्या माध्यमातून शहराध्यक्षांचा निषेध व्यक्त करून नाराजी व्यक्त केली आहे.

या संदर्भात शहराध्यक्षांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी संपर्क साधण्यात आला, मात्र त्यांनी फोन रिसिव्ह केला नाही.

विशाल गायकवाड यांची पोस्ट पुढीलप्रमाणे –

शोकांतिका..

देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी म्हणजे आपले दैवत. आपल्या नेतृत्वाला जवळून पाहण्याची इच्छा. त्यात आपण सरचिटणीस म्हटले तर आपल्याला संधी मिळणार हे डोक्यात पक्के पण हा सगळा भ्रमनिरासच..

रात्री भाजपा शहर अध्यक्षांनी वाँरीअर्सचे पास हातात दिले. त्यावेळी माझा सरचिटणीसचा पास कुठे (यासाठी दिवसातून 3 वेळा कॉल केला पण रिसिव्ह नाही) असे विचारले तर हाच पास असे उत्तर दिले. अध्यक्ष बोलले म्हणजे अंगात 7 हत्तीचे बळ आले.

रात्री 9 वाजता हे पास देताना व्ही व्ही आय पी च्या मागे खास परवानगी काढून आपल्या लोकांची व्यवस्था केली असे मिरवून सांगितले. जेव्हा कार्यक्रम स्थळी पोहोचलो तेव्हा पोलिसांनी हे कुठले पास फेकून द्या.. असे उंच स्वरात सांगितले. मी सरचिटणीस असूनही माझ्या बाबतीत असा अनुभव.. स्वतःच्या कार्यकारिणीतील सरचिटणीसला तुम्ही फसवले. (जाणून बुजून).

जे पक्ष हितासाठी काम करतात त्या कार्यकत्यांना हवेवर सोडून देऊन स्वतःच्या बगलबच्यांना व्ही व्ही आय पी पास दिले गेले. या गोष्टीसाठी शहर अध्यक्षचा निषेधच.

अनेक भाजपाचे पदाधिकारी यांच्यावर हा अन्याय आहे. कॅबिनेटपदी पक्षात पद असनुही हा अन्याय होतो. याला वाचा फोडावी लागणार.. कारण पासेसची यादी शहर अध्यक्ष प्रशासनाकडे पाठवितात. मी किमान हे चुकीचे झाले एव्हढे व्यक्त होतोय. खरे तर असंख्य कार्यकर्ते आहेत. त्यांच्या पण याच भावना आहेत.

पक्षाचे काम करताना जबाबदारी ने काम करा असे सांगितले जाते पण जिथे पद म्हणून रिस्पेक्ट हवा तिथे खड्यासारखे फेकणाऱ्या अध्यक्षांची कार्यशैली संशय निर्माण करते.

असो.. आमच्या विश्वनेत्याची सभा सेक्टर 2 मध्ये बसून तमाम जनतेसोबत ऐकण्याची संधीचे आम्ही सोने केले.

– विशाल गायकवाड,
सरचिटणीस, भाजपा सोलापूर शहर

Related Articles

Back to top button