डॉक्टर महिलेने केला आयुष्याचा शेवट!
Dr Jayashri Gawali Penur Life End Crime News
सोलापूर : मोहोळ तालुक्यातील पेनुर येथे डॉक्टर महिलेने आयुष्याचा शेवट केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील डॉ. ऋचा रुपनरकर या विवाहित महिलेने जगातून जाण्याचा निर्णय घेऊन एक महिना होत नाही तोपर्यंतच सोलापूर जिल्ह्यातील आणखी एका विवाहित डॉक्टर महिलेने आयुष्याचा शेवट केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मोहोळ तालुक्यातील पेनुर येथे डॉक्टर जयश्री प्रशांत गवळी (वय अंदाजे 38 ते 40) या महिलेने जगातून जाण्याचा निर्णय घेतला.
डॉक्टर जयश्री गवळी व त्यांचे पती डॉक्टर प्रशांत गवळी यांचे पेनुर येथे गवळी हॉस्पिटल या नावाने रुग्णालय आहे. त्यांना 3 अपत्य आहेत. शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास त्यांनी पेनूर येथील राहत्या घरात विषारी द्रव्य प्राशन केले. त्यानंतर त्यांना दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पंढरपूर येथील लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान २:२० मिनिटांनी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. पण डॉक्टर जयश्री गवळी आ..त्म..ह..त्या करण्याचा निर्णय का घेतला याचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही.