बालिकेवर दुष्कर्म करणाऱ्या तरुणाला..

Police Officer Shvetali Sutar Solapur Court News

सोलापूर : अल्पवयीन पिडीतेवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस 5 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा विशेष न्यायाधीश के. डी. शिरभाते यांनी सुनावली आहे.

विकी उर्फ विकास शिंदे (वय 24) असे आरोपीचे नाव आहे. या घटनेची हकीकीत अशी की, आरोपी विकी हा पिडीतेच्या घराजवळ राहण्यास असुन घटनेच्या वेळी पिडीता ही केवळ सहा वर्षाची होती. आरोपीने पिडीतेस स्वत:च्या घरात घेऊन गेला. दरवाजा बंद करुन टी.व्ही सुरु करुन पिडीतेस नवरा बायकोचा खेळ खेळु.. या असे म्हणुन तिच्यावर अत्याचार केले. पिडीतेच्या आईची नणंद हिने फिर्याद दिली.
फिर्यादीच्या अनुषंगाने तपास करुन तपास अधिकारी पी.एस.आय. श्वेताली सुतार यांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. या प्रकरणाची सुनावणी विशेष न्यायाधीश कविता डी शिरभाते जिल्हा व सत्र न्यायाधीश – ३ सोलापूर यांच्यासमक्ष झाली. यात सरकारतर्फे प्रकाश एस. जन्नु यांनी पिडीता ही अल्पवयीन असल्याचे माहित असुन ही आरोपीने पिडीतेसोबत लैगिक छळ व अत्याचार केल्याचे साक्षीपुराव्याद्वारे न्यायालयाच्या निदर्शनास आणले.
या प्रकरणात सरकारपक्षातर्फे एकुण 6 साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये पिडीता, पिडीतेची आई, वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्वाची ठरली. यावरुन आरोपीने पिडीतेवर अत्याचार केल्याचा युक्तीवाद सरकारतर्फे अॅड प्रकाश एस. जन्नु यांनी केला. युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपीस बाल लैगिंक अत्याचार कायदा कलम कायद्यानुसार दोषी धरुन आरोपीस बाल लैंगिक अत्याचार कायदा कलम १० अन्वये ५ वर्षे सक्त मजुरीची शिक्षा व ५०००/- रुपये दंडाची शिक्षा सुनावली व दंड न भरल्यास ३ महिने सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे. तसेच विधीसेवा प्राधिकरण यांना पिडीतेस योग्य तो नुकसान भरपाई देण्याचा आदेश केला आहे.
या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने अॅड प्रकाश एस. जन्तु यांनी काम पाहिले तर आरोपीच्या वतीने अॅड सागर पवार यांनी काम पाहिले सदर प्रकरणाचा तपास पी.एस.आय. श्वेताली सुतार यांनी केला तर कोर्ट पैरवी म्हणुन पोकॉ १८३३ विक्रांत कोकणे यांनी काम पाहिले.
तपास अधिकारी म्हणातात..
आजच्या काळात हर एकप्रकारे कोर्टात साम, दाम दंड, भेद या सगळ्यांचा वापर करून साक्षीदारांना फितूर केला जात. कधी आमच्याकडुन अनवधानाने तपासामध्ये काही उणीवा राहून जातात. त्यामुळे गुन्हेगारांना शिक्षा लागण अवघड असत. मी तपास केलेल्या गुन्ह्यामध्ये आरोपीला ५ वर्ष कारावासाची शिक्षा झाली. या गुन्ह्याच्या तपासामध्ये तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय जगताप सर यांचं मोलाचं सहकार्य लाभले. दप्तरी पोलिस अंमलदार इरफान पठाण यांनी पूर्ण तपासामध्ये साथ दिली आणि तत्कालीन कोर्ट पैरवि दैवशिला मैंदाड मॅडम यांनी court proceeding वर बारीक लक्ष ठेवल्याने आम्हाला महत्वाची पाऊले पावले उचलता आली चुकीच्या गोष्टी घडताना थांबवता आल्या. कोणत्याही गोष्टीमध्ये खूप लोकांचे हात आणि प्रयत्न असल्याशिवाय यश मिळत नाही.-
श्वेताली सुतार, तपास अधिकारी