सोलापूर

वाघचवरे परिवाराला बेस्ट रनिंग फॅमिलीचा किताब!

सोलापूर : मुंबई रोड रनर्सच्या वतीने घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात सोलापूरच्या डॉ. अभिजित वाघचवरे, डॉ.स्मिता झांजुर्णे, डॉ. सत्यजित वाघचवरे, डॉ.राजश्री वाघचवरे, डॉ. शुभांगी वाघचवरे, डॉ. परिक्षिता भोसले आणि परिवाराचा विशेष सन्मान करण्यात आला.

HTML img Tag Simply Easy Learning

रविवार दि. 17 मार्च रोजी मुंबईतील सांताक्रुझ परिसरातील वेलिंगटन कॅथालीक जिमखाना येथे ही स्पर्धा यशस्वीपणे पार पडली.

HTML img Tag Simply Easy Learning

अस्थिरोग तज्ञ अभिजित वाघचवरे आणि दंतरोग तज्ञ सत्यजित वाघचवरे हे त्यांच्या परिवारासह सोलापूर मॅरेथॉन असो की, महाराष्ट्र किंवा देशाच्या बाहेरील विविध मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी होवून यश मिळवले आहे. यांनी अनेक विक्रमही प्रस्थापित केले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर कॉम्रेड मॅरेथॉन आणि आर्यनमॅनचा किताबही डॉ. अभिजित वाघचवरे यांनी मिळवला आहे. त्याचबरोबर स्मिता झांजुर्णे या देखील अल्ट्रा मॅराथॉनर आणि आर्यनमॅनही आहेत. तसेच डॉ. सत्यजित वाघचवरे हे देखील मॅरॉथॉन रनर आहेत. नेहमी शरीर तंदुरूस्थ ठेवण्यासाठी तरूणांना मार्गदर्शन करणारे डॉ. वाघचवरे परिवाराची दखल घेवून मुंबई रोड रनर्स संस्थेने विशेष आमंत्रित करून त्यांना बेस्ट रनिग फॅमिलीचा प्रथम रनरअपचा किताब देवून त्यांचा सन्मान करण्यात आला.

वाघचवरे परिवारातील प्रत्येकाचा सन 2023 या वर्षभरातील रनिगचा डाटा तपासून हे बक्षिस देण्यात आले. याबद्दल बोलताना डॉ.अभिजित वाघचवरे यांनी सांगितले. संपूर्ण महाराष्ट्रात प्रेरणादायी रनिग करणारे परिवार म्हणून ओळखले जाणे आमच्या परिवारासाठी आणि सोलापूरकरांसाठी एक अभिमानाचा क्षण आहे.
महाराष्ट्रातील 16 हजार रनर्सचा गट असलेल्या या मुंबई रोड रनर्स कडून हे पारितोषिक मिळाले त्यामागे कठोर परिश्रम असल्याचे डॉ. सत्यजित वाघचवरे यांनी सांगितले. वाघचवरे परिवाराकडून शरीर आणि मन तंदुरूस्त ठेवण्यासाठी सोलापूर मध्ये अनेक उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्याचा सोलापूरच्या नागरीकांनी लाभ घ्यावा असेही यावेळी सांगण्यात आले. वाघचवरे परिवाराला यासाठी रन विथ सतीशचे कोच सतीश गुजारन आणि पॉवर पीक्सचे कोच चैतन्य वेल्हाळ यांचे मार्गदर्शन लाभले.

Related Articles

Back to top button