राजकीय

पद्मश्री मिलिंद कांबळे सोलापूरचे उमेदवार?

सोलापूर : भारतीय जनता पार्टीकडून पद्मश्री मिलिंद कांबळे यांना सोलापूर लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

गेल्या आठवड्यात निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. गेल्या पंधरा दिवसापासून लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. माढा लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीकडून विद्यमान खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर सोलापूर लोकसभेला उमेदवार कोण असणार हे अद्याप स्पष्ट करण्यात आले नाही. विद्यमान खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांना डच्चू मिळाले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर लोकसभेसाठी माजी खासदार अमर साबळे हे इच्छुक आहेत. माळशिरसचे आमदार राम सातपुते यांच्याही नावाची चर्चा आहे. भारतीय जनता पार्टीकडून अनेक जण इच्छुक आहेत. मात्र उमेदवारी कोणाला मिळणार हे स्पष्ट झाले नाही.

दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजची स्थापना करणारे उद्योजक पद्मश्री मिलिंद कांबळे यांना सोलापूर लोकसभेसाठी उमेदवारी मिळू शकते अशी चर्चा आहे. भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते विनोद तावडे यांच्या ते अगदी जवळचे आहेत.

कोण आहेत मिलिंद कांबळे? वाचा..

14 एप्रिल 2005 रोजी मिलिंद कांबळे यांनी ‘दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’ची स्थापना करून भारतीय उद्योगाच्या इतिहासात मैलाचा दगड रोवला. दलित उद्योजक तयार करणे, उद्योजकांना बळ देणे, यातून आर्थिक प्रगती करून दलितांचे प्रश्न सोडवण्यासाठी डिक्कीची स्थापना करण्यात आली. मात्र, सुरुवातीची पाच वर्षे संघर्षाची, अविश्वासाची, भटकंतीची, संशोधनाची आणि हळूहळू मिळणाऱ्या सहकार्याची होती. मात्र, 2010 मध्ये पुण्यात आयोजित दलित उद्योजकांच्या प्रदर्शनीने डिक्की प्रकाशझोतात आली. त्यानंतर 2011 मध्ये मुंबईचे दलित संमेलन मैलाचा दगड ठरले. रतन टाटा, आदि गोदरेज यांच्यासारख्या बड्या उद्योजकांच्या उपस्थितीने सगळ्यांचे लक्ष वेधले. अमेरिकेतील ब्लॅक इंडस्ट्रीसाठी हेन्री फोर्डने केलेल्या घोषणेप्रमाणेच टाटा यांनीही ५ ते १० टक्के सुटे भाग दलित उद्योजकांकडून घेण्याची घोषणा केली. दरम्यान 2013 मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे.

मुळगाव कोणते?

मिलिंद कांबळे यांचा जन्म 1967 मध्ये लातूर जिल्ह्यातील चोबळी गावात झाला. मिलिंद कांबळे यांचे वडील प्रल्हाद भगवान कांबळे हे सरकारी शाळेत शिक्षक होते आणि त्यांची आई कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होती.

Related Articles

Back to top button