गुन्हे वृत्त

तुमच्या वाहनावर ई चलन दंड आहे का?

E-Challan Payment Lokadalat Solapur Police News

HTML img Tag Simply Easy Learning

27 जुलै 2024 रोजी राष्ट्रीय लोक न्यायालय

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर : संपूर्ण भारतात दिनांक २७ जुलै २०२४ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. प्रलंबित खटले तडजोडीने निकाली काढण्याच्या दृष्टीने कोर्टाकडून वाहन चालक, मालक यांना जवळपास 10 हजार समन्स काढण्यात आले आहेत.

समन्स हे पोलीस ठाणे व ट्राफिक विभागाकडून संबंधितांना बजावणी करुन शहरातील व बाहेरील व्यक्तींना लोक अदालतीपुर्वी दंडाची तडजोडीची रक्कम भरणा करुन घेवून पुढील होणारी कायदेशीर कारवाई टाळून घेणेबाबत आवाहन पोलीसांकडून करण्यात येत आहे.

दंडाची तडजोडीची रक्कम भरणा करुन घेणेकरीता जेलरोड पोलीस ठाणेजवळील शहर वाहतुक शाखा व पाच्छा पेठ येथील डंम्पयार्ड तसेच सोलापूर म्युनसिपल कोर्ट, नवीन पासपोर्ट ऑफिस मागे, सोलापूर शहर याठिकाणी दंड भरुन घेणेकरीता पोलीस अंमलदार यांची नियुक्ती करुन सोय करण्यात आलेली आहे. तसेच शहरात महत्त्वाचे ठिकाणी व आपणास सोयीस्कर असलेल्या जवळच्या कर्तव्यावरील वाहतुक शाखेचे ज्या पोलीस अंमलदाराकडे ई-चलान मशीन आहे. त्यांच्याशी संपर्क साधून ई चलान मशीनद्वारे दंडाची रक्कम भरणा करुन भरणा पावती हस्तगत करु शकता अन्यथा ऑनलाईनवरुन सुध्दा दंड भरु शकता. त्यानुसार दंडाची तडजोडीची रक्कम भरणा करावी असे आवाहन याद्वारे करण्यात येत आहे. तसेच बाहेर जिल्ह्यातील समन्स असलेल्या वाहन धारक चालक यांनी सुध्दा ऑनलाईन दंड भरण्यास हरकत नाही, त्यांनी तो दंड न भरल्यास पुढील कार्यवाही केली जाईल प्रसंगी वॉरंट बजावण्याबाबत न्यायालयास विनंती केली जाणार आहे.

त्याचप्रमाणे दंडाची व तडजोडीची रक्कम ऑनलाईन https://mahatrafficechallan.gov.in/ या लिंकद्वारे तसेच mahatraffic हे अॅप अॅड्रॉयड वरुन डाऊनलोड करुन घेवून Phone pe, Google pay द्वारे तसेच QR code scan करुन भरु शकता असे आवाहन सहाय्यक पोलीस आयुक्त यशवंत गवारी यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button