गुन्हे वृत्त

खोटं लग्न कर.. 50 हजार देते!

सोलापूर : तुला 50 हजार रुपये देते.. प्रवीण वाणी या व्यक्तीसोबत खोटे लग्न कर असे म्हणून सोलापुरातील तरुण महिलेची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

रेणुका सिध्दाराम मडके (वय-३२ वर्षे, रा- मलय्या स्वामी याचे घरी भाडयाने ७० फुट रोड सोलापूर) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

संगीता क्षिरसागर (रा. लक्ष्मी नारायण थेअटर, सोलापूर) असे आरोपीचे नाव आहे. ही घटना दि. २०/०६/२०२४ रोजी २१.३० सुमारास गेंट्याल चौक परिसरात घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रेणुका मडके यांच्या शेजारी राहणारी रेखा बिराजदार हिचे ओळखीची संगीता क्षीरसागर हिने तुला काम देते.. त्याबदल्यात तुला 50 हजार रूपये देते.. पण मी जे काम सांगेन ते करावे लागेल असे सांगितले.

त्यावर रेणुका मडके हिने होकार दिला. दि २१/०६/२०२४ रोजी सकाळी ११.०० वा फिर्यादी मडके हिने फिर्यादीची ओळखीची रेखा बिराजदार व आरोपी संगीता क्षीरसागर हे चाळीसगाव येथे गेले. तेथे फिर्यादी मडके हिला सांगण्यात आले की तुला प्रविण वाणी या व्यक्तीबरोबर खोटे लग्न करायचे आहे. त्याबदल्यात तुला ५० हजार रूपये देणार.. असे म्हणून फिर्यादी रेणुका मडके हिची फसवणुक करण्यात आली.

आरोपीने फिर्यादी रेणुका मडके हिचे खोटे लग्न लावून प्रविण वाणी यांच्या भावाकडून अडीच लाख रूपये घेतले. फिर्यादीस तुझ्या लग्नाचे फोटो किंवा तुझ्या लग्नाचा व्हिडीओ व्हायरल करीन असे सांगून धमकी दिली आहे. अशा रीतीने फिर्यादीची फसवणुक केली आहे.

Related Articles

Back to top button