पर्यावरण / पर्यटन

फताटेवाडीत सापाची हत्या!

Snake killed in Fatatewadi Solapur Forest Department News

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर : सोलापूरपासून जवळच असलेल्या फताटेवाडी परिसरात सापाला मारल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते, चित्रकार विपुल मिरजकर यांनी केली आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

चित्रकार विपुल मिरजकर म्हणाले, फताटेवाडी परिसरात वॉल पेंटिंगचे काम सुरू आहे. त्या परिसरात साप निघाला होता. एका तरुणाने सापाला मारले. ज्या तरुणाने सापाला मारले त्याने स्वतः मला या संदर्भात माहिती दिली. मी याबाबत त्याच्याकडे नाराजी व्यक्त केली.

चित्रकार विपुल मिरजकर यांनी आपल्या फेसबुकवर या संदर्भात पोस्ट केल्यानंतर स्मार्ट सोलापूरकर डिजिटल मीडियाचे संपादक, वसुंधरा मित्र परशुराम कोकणे यांनी वन विभागाला माहिती कळवली. वनपरिक्षेत्र अधिकारी दीपक खलाने यांच्या आदेशानुसार वनविभागाचे पथक फताटेवाडी या ठिकाणी पोचले. गावामध्ये या संदर्भातील माहिती घेण्यात आली आहे.

वनाधिकाऱ्यांनी चित्रकार मिरजकर यांच्यासोबत संवाद साधला. वनाधिकाऱ्यांच्या भेटीनंतर मिरजकर यांनी फेसबुक वरील आपली पोस्ट डिलीट केली आहे.

ज्या तरुणाने सापाला मारले त्याला तसेच चित्रकार विपुल मिरजकर यांना सोमवारी वन विभागाच्या कार्यालयात बोलविण्यात आले आहे, अशी माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली आहे.

फताटेवाडीमध्ये खरंच सापाची हत्या झाली असेल तर वन विभागाने अधिक चौकशी करून संबंधित तरुणावर कारवाई करायला हवी. जनजागृती सोबतच वनविभागाकडून कायद्यानुसार कारवाई सुद्धा झाली पाहिजे.

वन्यजीव संवर्धन संरक्षणाबद्दल एवढी जनजागृती करून सुद्धा आजही ग्रामीण भागामध्ये तसेच क्वचित शहरांमध्ये सुद्धा वन्यजीवांची निर्घृणपणे हत्या, शिकार होण्याच्या बातम्या ऐकायला मिळत आहेत. म्हणजे वनविभागाच्या कारवाईचा धाक राहिला नाही की काय असे वाटते. घरोघरी, अनेकांच्या मोबाईलमध्ये सर्पमित्रांचे फोन नंबर शेअर करूनसुद्धा सर्पहत्या होत आहे हे दुर्दैवी आहे. फताटेवाडी येथील घटनेची चौकशी करून योग्य ती कारवाई व्हायला हवी.
– अजित चौहान,
अध्यक्ष वाईल्ड लाईफ कंजर्वेशन असोसिएशन

Related Articles

Back to top button