काळवीटाची शिंगे विकणाऱ्या अटक
Blackbuck Antelope Horns Solapur Police News
सोलापूर : विक्री करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीरित्या काळविटाचे 5 शिंगे बाळगणाऱ्या व्यक्तीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.
अजित अविनाश सरवदे (वय ३४ वर्षे, रा- घ. नं. १४८ हब्बु वस्ती, बुध्द विहार, देगाव रोड, सोलापूर) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
दिनांक १६/०६/२०२४ रोजी, सपोनि/जीवन निरगुडे व त्यांच्या तपास पथकाला गोपनिय बातमीदामार्फत बातमी मिळाली की, “एक इसम काळविटाची शिंगे विक्री करण्यासाठी बाळीवेस, सोलापूर या ठिकाणी येणार आहे. त्यानुसार, सपोनि/जीवन निरगुडे व तपास पथकाने सापळा लावला. आरोपी अजित अविनाश सरवदे (वय ३४ वर्षे, रा- घ. नं. १४८ हब्बु वस्ती, बुध्द विहार, देगाव रोड, सोलापूर)
यास ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली. त्याच्या हातातील पिशवीमध्ये काळवीट या वन्य प्राण्याची शिंगे मिळुन आली. त्याबाबत त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे आढळुन आले. त्याने विक्रीसाठी विनापरवाना बेकायदेशीर रित्या बाळगलेले (१) १८ इंच लांबीचे ०२ नग, (२) १४ इंच लांबीचे ०२ नग, (३) १० इंच लांबीचे ०१ नग असे एकुण ०५ काळवीटाचे शिंगे त्याचे ताब्यात मिळुन आले. याबाबत फौजदार चावडी पोलीस ठाणे, सोलापूर शहर गु.र.नं.३७६/२०२७ वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम ९, ३९, ४८, ४९(ब), ५१ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास फौजदार चावडी पोलीस स्टेशन करीत आहे.
ही कामगिरी एम. राज कुमार, पोलीस आयुक्त सोलापूर शहर, डॉ. दीपाली काळे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्रीमती प्रांजली सोनवणे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे, सुनिल दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली, स.पो.नि./जीवन निरगुडे, पोलीस अंमलदार दिलीप किर्दक, वाजीद पटेल, योगेश बर्डे, संजय साळुंखे यांनी केली आहे.
काय करतय वनविभाग?
सोलापूर वनविभागातील अधिकारी आणि कर्मचारी तक्रार आल्याशिवाय काम करत नाहीत. शहर आणि परिसरामध्ये शिकारीचे प्रमाण वाढले आहे. काळवीटांचे शिंगे यासह इतर वन्य प्राण्यांसंदर्भातील तस्करीचे प्रमाण सोलापुरात असतानाही वन विभागाकडून गेल्या काही दिवसात कोणत्याही प्रकारची कारवाई झाल्याचे दिसत नाही. याबाबत सोलापुरातील वन्यजीव प्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.