पर्यावरण / पर्यटन

निसर्गरम्य दांडेलीत उत्साहपूर्ण भटकंती

इको फ्रेंडली क्लबचा उपक्रम, सोबतच रिव्हर राफ्टिंग आणि इतर वॉटर स्पोर्ट्सचा आनंद

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर : निसर्गरम्य दांडेली परिसरात इको फ्रेंडली क्लबने भटकंती आयोजित केली होती. सोलापुरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या उन्हाळी भटकंतीचा आनंद लुटला. यासोबतच विविध वॉटर स्पोर्ट्स् करत एडवेंचर अनुभवले. या उपक्रमात ४५ हून अधिक निसर्गप्रेमींनी सहभाग नोंदविला.

HTML img Tag Simply Easy Learning

शुक्रवार दि. १२ एप्रिल रोजी सायंकाळी इको फ्रेंडली क्लबची टीम दांडेलीकडे रवाना झाली. शनिवारी सकाळी सर्व निसर्गप्रेमी ग्रीन प्लॅनेट रिव्हर स्टे या रिसॉर्टवर पोचले.

फ्रेश होऊन सर्वांनी चहा नाश्ता केला. त्यानंतर सर्वजण बस प्रवास करत ऍक्वा वूड अडव्हेंचर येथे पोचले. त्याठिकाणी सर्वांनी रिव्हर राफ्टिंग, झिप लाईन या एडवेंचर ऍक्टिव्हिटीचा आनंद घेतला. सोलापुरातल्या अतिशय कडक उन्हातून जाऊन दांडेली येथे काली नदीत वॉटर स्पोर्ट्स करून सर्वजण आनंदून गेले.

त्यानंतर बस प्रवास करत सर्वजण रिसॉर्टवर आले. दुपारचे जेवण करून सर्वांनी रिसॉर्टवर स्विमिंगपूलमध्ये धमाल मस्ती केली. सोबतच रेन डान्सचा आनंदही घेतला. रात्रीचे जेवण करून सर्वांच्या गप्पा रंगल्या.

भटकंतीच्या दुसऱ्या दिवशी अंजली हणसे यांच्या पुढाकाराने सर्वांनी योगा शिबिरात सहभाग नोंदवला.

त्यानंतर सर्वजण जंगल भटकंतीसाठी निघाले. काली नदीचे बॅक वॉटर पाहून सर्वजण खुश झाले. परत येऊन सर्वानी चहा नाश्ता केला.

त्यानंतर सर्वजण मौलंगी पार्क परिसरातील अंश रिसॉर्टमध्ये विविध वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेतला. बोटिंग, कायाकिंग, जॉरबिंग असे वॉटर स्पोर्ट्स सर्वांनी एन्जॉय केल्या. त्यानंतर सर्वजण रिसॉर्टवर परत आले.

दुपारचे जेवण करून सर्वांचा परतीचा प्रवास सुरु झाला. परतीच्या प्रवासात आंबेवाडी येथील बालमुरी गणेश मंदिराला भेट दिली. वाटेत रात्रीचे जेवण करून सर्वजण पहाटे सोलापुरात पोचले.

इको फ्रेंडली क्लबचे संस्थापक, वसुंधरा मित्र परशुराम कोकणे, समन्वयक अजित कोकणे, सदस्य संतोषकुमार तडवळ यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या उपक्रमात गंगुबाई कोकणे, सरस्वती कोकणे, आराध्या कोकणे, पूजा शेरखाणे कोकणे, ॲड. साधना पांडुरंग काकडे, डॉ सुमेधा कंदलगावकर, ऋषी कंदलगावकर, रुद्र कंदलगावकर, रुपाली अदाते, अर्चित अदाते, संध्या त्रिमल, पद्मजा विष्णू जोशी, सई धुमाळ, निर्मला धुमाळ, गौरी होल्लूर, राधिका होल्लूर, मनीषा मल्लिकार्जुन ताटी, नागमणी रमेश पुल्ली, अंजली महेंद्र हंसे, सुहासिनी सखाराम आवटे, माया अशोक ढवळे, परिचिता शहा, स्वरीत शहा, विनय धुलराव, पौर्णिमा धुलराव, गिरीश प्रभाकर घोगले, उमा गिरीश घोगले, वृषाली वझे, जान्हवी पवार, अनुष्का महेश बुट्टे, चंद्रकांत जाधव, परिमल चंद्रकांत जाधव, श्रीशा शिवाजी देशमुख, प्रसाद पांडुरंग मुगळे, पल्लवी प्रसाद मुगळे, प्रणवी पल्लवी प्रसाद मुगळे, अनुष्का बुट्टे, जान्हवी पवार, वृषाली वाले, प्रेमा कुंभार, गौसपाक हल्याल, नफिसा हल्याल, शुभम काडगावकर, संगमनाथ नागोजी, सनी पाटील, सचिन कांबळे यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.

ही निसर्ग भ्रमंती आनंददायी होण्यासाठी चडचणकर ट्रॅव्हल्सचे संचालक सोमनाथ चडचणकर, बस चालक समीर मस्के, सहाय्यक आतीश तांबे यांचे सहकार्य लाभले.

Related Articles

Back to top button