पर्यावरण / पर्यटन

तोरणा किल्ल्यावर भटकंतीने नववर्षाची सुरवात

इको फ्रेंडली क्लबचा उपक्रम, रोहिडा किल्ला, नेकलेस पॉईंट, बनेश्वर मंदिर, एकमुखी दत्त मंदिरालाही भेट

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर : निसर्ग पर्यटन वाढावे यासाठी कार्यरत असलेल्या सोलापुरातील इको फ्रेंडली क्लबच्यावतीने नववर्षाचे स्वागत निसर्गाच्या सानिध्यात या उपक्रमांतर्गत यंदा पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील रोहिडा किल्ला आणि वेल्हे तालुक्यातील ऐतिहासिक तोरणा किल्ल्यावर भटकंती केली. या उपक्रमात सोलापूर आणि पुणे येथील 50 हून अधिक निसर्गप्रेमी सहभागी झाले होते.

HTML img Tag Simply Easy Learning

शनिवार दि. 30 डिसेंबर रोजी सोलापूर येथून प्रवासाला सुरवात झाली. नववर्षाच्या निमित्ताने होणार्‍या या उपक्रमाला आणि ट्रेकर्सला शुभेच्छा देण्यासाठी लोहमार्ग पोलीस विभागाच्या वरिष्ठ पोलीस अधिकारी संगीता हत्ती, माजी नगरसेवक, आकाशवाणीचे निवेदक गुरुशांत धुत्तरगावकर हे आले होते. दोन्ही मान्यवरांनी इको फ्रेंडली क्लबच्या उपक्रमाचे कौतूक करुन शुभेच्छा दिल्या. मान्यवरांच्या शुभेच्छा स्वीकारुन हा ताफा पुढे रवाना झाला.

31 डिसेंबर रोजी पहाटे सर्वजण नारायणपूर येथील हॉटेल पुरंदर प्राईड येथे पोचले. फ्रेश होवून चहा आणि नाश्ता केला. पुणे येथील आलेले निसर्गप्रेमीही जॉईन झाले. सर्वांनी नारायणपूर येथील प्रसिद्ध एकमुखी दत्ताचे दर्शन घेतले. त्यानंतर इको फ्रेंडली क्लबचा ताफा केतकवळे, कापुरहोळ, भोर मार्गे रोहिडा किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या बाजारवाडी गावात दाखल झाला.

स्थानिक हॉटेल चालक विकास शिंदे यांनी सर्वांचे स्वागत करुन रोहिडा किल्ल्याचा इतिहास सांगितला. इको फ्रेंडली क्लबचे संस्थापक, वसुंधरा मित्र परशुराम कोकणे यांनी भटकंतीच्या अनुषंगाने सुचना दिल्या. छत्रपती शिवाजी की जय.., छत्रपती संभाजी महाराज की जय.. वंदे मातरम.. या घोषणा देत पहिल्या दिवशीच्या किल्ला भटकंतीला सुरवात झाली. दीड तासात सर्व ट्रेकर्स रोहिडा किल्ल्यावर पोचले.

संकटमोचन हनुमानाचे दर्शन घेऊन गडफेरीला सुरवात झाली.

3540 फूट उंच असलेल्या रोहिडा किल्ल्यावरुन दिसणारे निसर्ग सौंदर्य सर्वांनी डोळ्यात आणि मोबाईल कॅमेर्‍यात कैद केले.

गडउतार झाल्यानंतर बाजारवाडीतील हॉटेल चालक विकास शिंदे यांच्याकडे दुपारच्या जेवणाचा आस्वाद घेतला. पिठलं भाकरीने सार्‍यांना तृप्त केले.

सायंकाळी भोर परिसरात प्रसिद्ध नेकलेस पॉइंटवर सर्वांनी वर्षाचा शेवटचा सूर्यास्त पहिला आणि सरत्या वर्षाला निरोप दिला.

निसर्गाच्या रंगछटा पाहून सर्वजण आनंदून गेले. सूर्यास्तानंतर सर्व ट्रेकर्स बस प्रवास करत मुक्कामाच्या ठिकाणी आले. रात्रीच्या जेवणानंतर गप्पा गोष्टी झाल्या. रात्री 12 वाजता उत्साहात नववर्षाचे स्वागत केले. प्राजक्ता दिघे यांच्या हॉटेल सह्याद्री अँड स्टे येथे सर्वांच्या जेवणाची आणि मुक्कामाची सोय करण्यात आली होती.

नववर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे 1 जानेवारी 2024 रोजी सकाळी सर्वजण तोरणा किल्ल्याच्या ट्रेकसाठी निघाले. प्रारंभी इतिहासप्रेमी, व्लॉगर अजित वेणुपुरे यांनी सर्वांना मार्गदर्शन केले आणि आवश्यक त्या सूचना दिल्या. नवीन वर्षाची सुरुवात निसर्गाच्या सानिध्यात होत असल्याने सर्वजण आनंदात होते.

सुरक्षितपणे ट्रेकिंग करत सर्वजण तोरणा किल्ल्यावर पोचले. गडदेवता तोरणजाई मातेचे दर्शन घेतले. झुंजार माची, बुधला माची आणि गडावरील इतर ऐतिहासिक ठिकाणे सर्वांनी पाहिली.

इतिहासप्रेमी अजित वेणूपुरे यांनी सर्वांना तोरणा किल्ल्याचा इतिहास आणि परिसराची माहिती दिली.

गडावर दुपारचे जेवण करून सर्वजण सुरक्षितपणे खाली उतरले. परतीच्या प्रवासात सर्वांनी नसरापुर येथील श्री बनेश्वराचे दर्शन घेतले. त्यानंतर कोपुरहोळ येथील रवी गाडे यांच्या राजवाडा हॉटेलमध्ये रात्रीचे जेवण केले. आणि परतीचा प्रवास सुरु केला.

प्रवास सुखकर होण्यासाठी चडचणकर ट्रव्हल्सचे संचालक जगदीश चडचणकर आणि सोमनाथ चडचणकर यांच्या मार्गदर्शनाखाली चालक श्री. घोरपडे, त्यांचे सहकारी अतिश तांबे यांचे सहकार्य मिळाले. पुणे सदस्यांच्या प्रवासाकरिता अतुल दाभाडे यांचे सहकार्य लाभले.

इको फ्रेंडली क्लबचे संस्थापक, वसुंधरा मित्र परशुराम कोकणे, समन्वयक सटवाजी उर्फ अजित कोकणे, सदस्य संतोषकुमार तडवळ, ज्येष्ठ पत्रकार विनायक होटकर, माधव वडजे, पल्लवी सद्दलगी, देवाशिष शहा यांच्या नेतृत्वाखाली या उपक्रमात सोलापूर येथून संतोष घुगे, पद्मकांत घंटे, डॉ. गोविंद बाबुराव तावरे, शिल्पा राजेश माळी, साची माळी, रेवती रवींद्र घनाते, स्नेहल निलेश खमितकर, डॉ. प्रवीण बिरगे, नीता संतोष चिपडे, सहिषा चिपडे, सरस्वती कोकणे, परिचिता शहा, स्वरित अपूर्व शहा, सुहित धामणगावकर, प्राची धामणगावकर, डॉ.योजना संजय टोळे, वैष्णवी जयंत होलेपाटील, संजय साहेबराव टोळे, अंजली रवी कुंभार, कु.श्रद्धा आशिष पाटील, केतकी प्रशांत धामणकर, अक्षया शहा, किशोरी शहा, आराध्या कोकणे, गंगुबाई कोकणे, मोनिका तावनिया, अपूर्वा कुलकर्णी, डॉ. ऋतुजा निराळे, गीतांजली बेडगे, पूजा शेरखाने – कोकणे, समीर कलादगी, संगमनाथ नागोजी, नंदकिशोर साळुंखे, ईश्वर बुरा, आर्यन विनायक होटकर, कृष्णा प्रल्हाद काशीद, सोहम थिटे, यश पवार, प्रशांत तुकाराम जाधव,
पुणे येथून सुब्रमण्यम घंटे, मृणाल कुलकर्णी, अवनी भरले, युक्ता जोशी, अभिषेक रणदिवे, रुषिकेश काकडे, सातारा येथून सुनील मसूरकर यांनी सहभाग नोंदविला.

अजित वेणुपुरे यांचा सन्मान
आरोग्य विभागातील नोकरी सांभाळून सह्यादीमध्ये भटकंतीची आवाड जोपासणारे अजित वेणुपुरे यांचा इको फ्रेंडली क्लबच्यावतीने सन्मानपत्र, सोलापूरची शेंगा चटणी, टॉवेल भेट देवून विशेष सन्मान करण्यात आला.

धाराऊंचे वशंज रवी गाडे पाटील यांची भेट
छत्रपती संभाजी महाराजांचे दुधआई असलेल्या धाराऊंचे तेरावे वशंज रवी गाडे यांच्या कापुरहोळ येथील हॉटेल राजवाडामध्ये उत्तम जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. इको फ्रेंडली क्लबतर्फे रवी गाडे पाटील यांचा सोलापूरची शेंगा चटणी भेट देवून सत्कार करण्यात आला.

लग्नाचा वाढदिवस साजरा
ट्रेकमध्ये सहभागी झालेले संजय टोळे आणि योजना टोळे यांचा लग्नाचा वाढदिवस उत्साहाने साजरा करण्यात आला. यासाठी शहा परिवाराने पुढाकार घेतला होता. श्री व सौ टोळे यांनी सुंदर गाणी सादर केली.

बस प्रवासात धमाल
बस प्रवासामध्ये कलाकार आणि हौशी कलाकारांनी आपल्या कलेचे सादरीकरण करुन सर्वांचा उत्साह वाढविला. यात गायिका केतकी रानडे यांनी आपल्या सुंदर आवाजात सुंदर गाणी सादर करुन सर्वांची मने जिंकली. बसमधील सदस्यांनी उत्स्फुर्तपणे बक्षीस देवून कलेचे कौतूक केले. तसेच सहभागी सदस्य संगमनाथ नागोजी, देवाशीष शहा यांनीही आपल्या कलेचे सादरीकरण करुन धमाल केली.

Related Articles

Back to top button