गुन्हे वृत्त

नवरा बायकोच्या भांडणात पोलिसाला..

सोलापूर : पत्नीला मारहाण करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अडवले. त्यावेळी तुला काय करायचे आहे? नवरा बायकोच्या भांडणामध्ये तू येऊ नको.. असे म्हणून पोलिसाला मारून दुखापत केल्याची घटना घडली आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

पोलीस हवालदार श्रीधर गायकवाड यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

या घटनेची अधिक माहिती अशी की, 2 जानेवारी 2024 रोजी रात्रीच्या सुमारास घरकुल पोलीस चौकीच्या मागे असलेल्या महापालिका दवाखाना येथे आरोपी गणेश काकडे हा त्याची पत्नी सुषमा काकडे हिला मारहाण करीत होता. त्यावेळी पोलीस हवालदार श्रीधर गायकवाड हे त्या ठिकाणी गेले. त्यांनी दोघांना घरकुल पोलीस चौकीमध्ये आणले. त्यावेळी आरोपी गणेश काकडे याने पोलीस हवालदार श्रीधर गायकवाड यांना तुला काय करायचे आहे.. आमचे नवरा बायकोचे भांडण आहे.. तू मध्ये येऊ नको.. असे म्हणून अंगावर धावून जाऊन पोलिसाच्या वर्दीची गच्ची पकडली. डाव्या डोळ्याजवळ जोराने मारून दुखापत केली. झटपटीमध्ये पोलीस हवलदार गायकवाड यांच्या गणवेशाचे बटन तुटून शर्ट फाटला. आरोपीने घरकुल पोलीस चौकीच्या दरवाजाला जोरात लाथ मारून दरवाजा तोडून नुकसान केले.

हवालदार श्रीधर गायकवाड हे शासकीय काम करत असताना कामात अडथळा आणून दुखापत पोचवले असल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक कुकडे तपास करीत आहेत.

Related Articles

Back to top button