गुन्हे वृत्त

लाल बावटा कार्यालयात आयुष्याचा शेवट!

lal bawata office solapur life end aadam mastar news

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर : अल्लाउद्दिन बाबुलाल शेख (वय वर्ष 80) ही व्यक्ती आज सकाळी साडेअकराच्या सुमारास दत्त नगर लाल बावटा कार्यालयात गळफास घेतल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

गांधी नगर परिसरातील त्यावेळचे कार्यकर्ते प्रभाकर तेलंग, बाबू कोकणे, लिंगव्वा सोलापूरे आणि अल्लाउद्दीन शेख हे 1979 च्या सुमारास गांधी नगर झोपडपट्टी क्रमांक 6 हे बेकायदेशीर असून सोलापूर महानगर पालिका तर्फे उध्वस्त करण्यासाठी आले असता तेथील नागरिक तत्काळ तत्कालीन आमदार कॉ.आडम मास्तर यांच्याकडे धाव घेतली होती. तेव्हा आडम मास्तर तत्काळ त्याठिकाणी पोहोचले व झोपडपट्टीला शासनाकडून संरक्षण मिळवून दिले. तेव्हापासून तो परीसर मास्तरांच्या प्रभावात होता. त्यामुळे सतत अनेक जनतेचे सामाजिक व न्याय हक्काच्या प्रश्नांवर लढा देताना त्यात या भागातील श्रमिक वर्ग सहभागी होत असत. याच दरम्यान 1985 साली माकपकडून अल्लाउद्दीन शेख यांना सोलापूर महानगर पालिकेची उमेदवारी देण्यात आली होती.

काही काळानंतर ते पक्षाचे सदस्यत्व नुतनीकरण न केल्याने त्यांचे सभासदत्व रद्द करण्यात आले. तदनंतर अन्य पक्षाकडे ते गेले. माकपशी कोणतेच संबंध पुढे ते ठेवले नाहीत. जनता दल, काँग्रेस अशा अन्य पक्षात गेले. परंतु आधी मधी मास्तर यांच्यावर वैयक्तिक प्रेम असल्याने भेटत होते. लोकांचे प्रश्न मांडत होते. कॉ. आडम मास्तर सुध्दा शक्य तितके प्रश्न मार्गी लावत असत.

आज सकाळी सुध्दा शेख नेहमी प्रमाणे मास्तरांना सहज भेटले. त्यानंतर कॉ.आडम मास्तर यांचे नातेवाईकांचे निधन झाल्याने कार्यालयातून निघून गेले. कार्यालयात नेहमीच लोकांची वर्दळ सुरू असते व कार्यकर्ते ही आपापल्या कामात व्यस्त असतात. तेवढ्यात दर्शनी भागावर असलेल्या एका खोलीत एक कार्यकर्ता काही कामानिमित्त खोलीचा दरवाजा उघडताच अल्लाउद्दीन शेख हे गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. तेव्हा तत्काळ जेलरोड पोलीस ठाणे यांना खबरबात देण्यात आली. सिव्हील हॉस्पिटलकडून तातडीने अंबुल्स येऊन मृतदेह ताब्यात घेतले. पुढील तपास जेलरोड पोलीस ठाणे मार्फत सुरू आहे.

यावेळी कॉ.युसुफ मेजर यांनी सिव्हील हॉस्पिटलमध्ये मयताच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. दरम्यान मृताच्या नातेवाईकांनी एका डिजिटल मीडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये आडम मास्तर यांच्यावर आरोप केले आहेत. या संदर्भात अद्याप पोलिसांकडून अधिकृत माहिती उपलब्ध झाली नाही. लालबावटा कार्यालयात नेमके काय घडले? हे पोलीस तपासानंतरच समोर येण्याची शक्यता आहे.

Related Articles

Back to top button