चंद्राच्या प्रकाशात घेतला निसर्ग अनुभव
सोलापूर : बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने गुरुवारी रात्री 9 ते 11 या वेळेत सोलापूर वन विभाग सोलापूर यांच्या वतीने सिध्देश्वर वनविहार येथे चंद्राच्या शितल प्रकाशात निसर्ग अनुभव उपक्रम राबवण्यात आला.
निसर्ग आणि वन्यप्राणी यांची सोलापूर शहरातील नागरिकांना या बाबत माहिती होण्यासाठी उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, सहाय्यक वनसंरक्षक बाबा हक्के यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी माजी मानद वन्यजीव रक्षक निनाद शहा, वन्यजीव अभ्यासक शिवानंद हिरेमठ, पत्रकार अरविंद मोटे यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमात निनाद शहा यांनी सोलापूर शहरातील निसर्ग संपदा जपली पाहिजे. प्रत्येकाने वृक्ष लागवड करून ती वाढवली पाहिजे असे असे उपस्थितांना आवाहन केले. वन्यजीव अभ्यासक शिवानंद हिरेमठ यांनी पक्षी व वन्य प्राणी यांचे जीवन चक्र उलगडून सांगितले. या कार्यक्रमासाठी सोलापूर शहरातील वनजीव प्रेमी व अभ्यासाक आणि विविध अशासकीय संस्थेचे प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून साळुंके सर विभागीय वन अधिकारी पुणे यांची उपस्थित लाभली. तसेच सोलापूर वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री दीपक खलाणे, वनपाल श्री शंकर कुताटे, वनपाल रुकेश कांबळे व इतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाची प्रस्तावना श्रीमती अश्विनी सोनके यांनी केली. या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात बालगोपाळ सुध्दा उपस्थित होते. त्यांनी चंद्राच्या प्रकाशात निसर्ग भर्मतीचा आनंद लुटला.
पर्यावरण अभ्यासक मुकुंद शेटे, संजय भोईटे आणि इतर अभ्यासकांनी उपस्थित निसर्गप्रेमींना पर्यावरण विषयक माहिती सांगितली.
या कार्यक्रमाला महापालिकेच्या वित्त अधिकारी रूपाली कोळी, शंकर कोळी, पर्यावरण अभ्यासक बाबा गायकवाड, अरुण शिखरे, इको फ्रेंडली क्लबचे संस्थापक, स्मार्ट सोलापूरकर डिजिटल मीडियाचे संपादक परशुराम कोकणे, पर्यावरणप्रेमी संतोष धाकपाडे, सुरेश क्षीरसागर यांच्यासह नेचर कंजर्वेशन असोशियन, इको फ्रेंडली क्लब, विहंग मंडळ यांच्यासह इतर संस्थांचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.