गुन्हे वृत्त

दारुच्या नशेत आईला शिवीगाळ करणाऱ्या लखनला संपवलं!

Solapur Bale Lakhan Gaikwad M.u.r.d.e.r News

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर : दारूच्या नशेत आईला शिवीगाळ करणाऱ्या लखन रघुनाथ गायकवाड (वय २३ वर्षे, रा- तोडकरवस्ती बाळे पुणे रोड सोलापूर) याचा खू..न.. झाला आहे. लखन हा गाडीवर क्लीनर काम करत होता. याप्रकरणी आईच्या फिर्यादीवरून फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

ही घटना दि १६/०५/२०२४ रोजी १६.३० वा चे सुमारास तोडकरवस्ती बाळे पुणे रोड सोलापूर येथे घडली आहे. मयत लखनची आई अलका रघुनाथ गायकवाड (वय-५५ वर्षे, रा- तोडकरवस्ती बाळे पुणे रोड सोलापूर) त्यांनी फिर्याद दिली आहे.

या प्रकरणात नागेश ज्ञानेश्वर कोळेकर (रा- तोडकर वस्ती बाळे), आशितोष ऊर्फ आवी राजू गाडेकर (रा. मेंगाणे नगर बाळे सोलापूर) या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. मयत लखन हा नागेश च्या गाडीवर क्लिनर म्हणून काम करत होता.

यात हकिकत अशी की, फिर्यादी गायकवाड यांचा मुलगा लखन याला दारू पिण्याचे व्यसन होते. तो सतत दारू पित असत. दिनांक १६/०५/२०२४ रोजी १६.३० वा दारूच्या नशेत घरी येऊन आईला दारू पिण्यासाठी पैसे दे असे म्हणत होता. तेव्हा आईने माझ्याकडे पैसे नाहीत असे सांगत असताना त्याने आईला शिवीगाळ करीत होता.

त्यावेळी नागेश आणि आशुतोष तिथे आले. लखन यास आईस शिवीगाळ का करत आहे. तुला सांगितलेले कळत नाही काय.. असे म्हणून शिवीगाळ करून दोघांनी लाकडी दांडका व प्लॅस्टिकच्या पाईपने लखनच्या अंगावर, हातावर, पायावर, छातीवर मारहाण केली.‌ लखनच्या आईने मारहाण करू नका असे सांगत असताना त्या दोघांनी त्यांचे काही ऐकले नाही. लखन यास मारहाण करून जखमी करून जीवे ठार मारले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक बारावकर तपास करीत आहेत.

Related Articles

Back to top button