पर्यावरण / पर्यटन

नांदणीत साकारले वनउद्यान

सोलापूर : सोलापूर वन विभागाने उभारलेल्या नांदणी वनउद्यानाचे पालकमंत्री तथा उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोदयोग आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील
यांच्या हस्ते आज गुरुवारी लोकार्पण सोहळा पार पडला आहे. कार्यक्रमासाठी सुभाष देशमुख, विधानसभा सदस्य, दक्षिण सोलापूर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning

HTML img Tag Simply Easy Learning

यावेळी मा. श्री. धैर्यशिल पाटील उपवनसंरक्षक सोलापूर, श्री बाळासाहेब यादव विशेष कार्य अधिकारी, श्री दिलीप पवार जिल्हा नियोजन अधिकारी, श्री पुंडलिक गोडसे सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी, श्री प्रसाद घाडगे सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी, मा. श्री. बाबा गोरख हाके सहाय्यक वनसंरक्षक, सोलापूर, श्री. डी. पी.खलाणे वनपरिक्षेत्र अधिकारी रोहयो सोलापूर, डॉ. श्री. चन्नगोंडा हवीनाळे, श्री प्रशांत हुल्ले सहाय्यक पोलिस निरीक्षक, श्री शिवानंद बंडे, सरपंच नांदणी, श्री मल्लिकार्जुन सुरवसे, सेवानिवृत्त पोलिस अधिकारी, श्री हनूमंत कुलकर्णी, ग्रामस्थ, वनविभागाचे कर्मचारी उपस्थीत होते.

सदर कार्यक्रमामध्ये धैर्यशिल पाटील उपवनसंरक्षक, सोलापूर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करत असताना सदरचे वनउद्यान जिल्हा नियोजन निधीमधून बनविण्यात आले असून, त्यामध्ये लहान मुलांसाठी बालोद्यान, ट्री लाईन, हवामानस्थानक, बंजी जंम्पिग, टेहळणी मनोरा तसेच हिरकणी कक्ष, वन्यप्राण्याविषयी माहिती देणाऱ्या बोलक्या भिंती, वन्यप्राण्यांचे पुतळे, ग्रीन टनेल, स्थानिक वृक्षलागवड, वाहतुक नियम संकेतचिन्ह, ॲम्पिथिएटर, अशा बाबींचा समावेश असल्याचे नमूद केले.

वनविभागातर्फे पहिल्यांदाच जिल्हा नियोजनमधून वनउद्यान बनविण्याचा प्रयोग साकारण्यात आला आहे. यामुळे वनपर्यटनाला चालना मिळेल असे नमूद करत सर्वांचे स्वागत केले.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुभाष देशमुख, उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांच्यासोबत वनविभागाचे सर्व अधिकारी आणि कार्यालयीन स्टाफ

सुभाष (बापू) देशमुख विधानसभा सदस्य, दक्षिण सोलापूर यांनी बोलत असताना ग्रामीण भागात वन पर्यटनाच्या संधीमूळे नांदणी गावाच्या विकासात नक्की भर पडेल असे प्रतिपादन केले. याचबरोबर मा.ना.श्री. राधाकृष्ण विखे पाटील, महसूल मंत्री तसेच माजी पालकमंत्री सोलापूर यांनी वनपर्यटनास निधी उपलब्ध करून दिल्याने आभार मानले. वनपर्यटनातून व इतर शासकिय योजनातून दक्षिण सोलापूर तालुक्याच्या विकासात भर पडेल असे नमूद करत असताना कुडल संगम, वडकबाळ, होटगी अशी पर्यटनस्थळे विकास कामे सुरु असल्याचे नमूद केले. तसेच स्थानिक लोकांना रोजगार निर्मीती, निसर्ग संवर्धनासोबत शास्वत विकास साध्य करणे महत्वाचे आहे असे नमूद केले.

त्यानंतर चंद्रकांत (दादा) पाटील पालकमंत्री तथा उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोदयोग आणि संसदीय कार्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी वनउद्यानातील ध्यानमंदिर, टेहळणी मनोरा, बालोद्यान, साहसी खेळ अशा कामांची पाहणी केली व त्यांचे हस्ते वृक्षलागवड करण्यात आली. मनोगत व्यक्त करत असताना सदरचे वनउद्यान हे सोलापूरच्या पर्यटनात विशेष भर घालणार असून वनउद्यानास विद्यार्थ्यांच्या निसर्ग सहलीतून वनपर्यटनास चालना देण्यावरती भर दिला. तसेच नांदणी वनपर्यटनासाठी पुढील आर्थिक वर्षात निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे सांगितले. स्थानिक नागरिकांनी पर्यटनातून रोजगार निर्मीती व विकास याबाबत जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा असे नमूद करून मनोगत संपविले.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करत असताना बाबा गोरख हाके सहाय्यक वनसंरक्षक, सोलापूर यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे, सोलापूर सोशल फाऊंडेशन, रानवेध फाऊंडेशन, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, अशासकिय स्वंयसेवी संस्था तसेच नांदणी ग्रामस्थासह सर्वांचे आभार मानले.

रानावेधने मांडली होती संकल्पना

मौजे नांदणी हे गाव सोलापूर जिल्हयाच्या ठिकाणापासून 25 कि.मी. अंतरावर असून सोलापूर- विजापूर महामार्ग क्रमांक 52 लगत वसलेले आहे. कर्नाटक राज्याच्या सिमेपासून 10 कि. मी अंतरावर आहे. तसेच विजापूर-कुडल संगम-सोलापूर या पर्यटन मार्गावर नांदणी वनउद्यान हा पर्यटकांचा महत्वाचा विसावा असल्याने या ठिकाणी वनक्षेत्रात गट क्रमांक 03 मध्ये 2.00 हे. क्षेत्रावर “नांदणी वनउदयान” ची निर्मिती आमदार सुभाष (बापु) देशमुख यांच्या विशेष प्रयत्न आणि मार्गदर्शनाद्वारे साकारण्यात आली आहे. याकरिता 1 कोटी 52 लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. पत्रकार विनोद कामतकर यांनी रानवेध निसर्ग मंडळाच्या माध्यमातून नांदणी वनउद्यानाची संकल्पना मांडली होती. हा प्रकल्प प्रत्यक्षात आणल्याबद्दल विनोद कामतकर यांनी वनाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत. या वनउद्यानामध्ये प्रवेशाकरिता नाममात्र शुल्क आकारण्यात येणार आहे.

काय आहेत आकर्षण?

1) ग्रीन टनेल व बोलक्या भिंती (चित्रे)
2) हवामान स्थानक
3) वन्यप्राण्यांचे पुतळे
4) वॉच टॉवर
5) ट्रॅफिकचे संकेत फलक
6) स्थानिक वृक्षलागवड
7) बंजी जंपिंग
8) बालोउद्यान
9) ॲम्फी थीएटर
10) ध्यान मंदिर
11) पॅगोडा
12) हिरकणी कक्ष
13) स्वच्छता गृह

Related Articles

Back to top button