सोलापूर

रियाची दिल्लीतील प्रजासत्ताक दिन परेडसाठी निवड

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची विद्यार्थिनी रिया दशरथसिंग परदेशी या विद्यार्थिनीची दि. 26 जानेवारी 2024 रोजी नवी दिल्ली, राजपथ येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिन परेडसाठी निवड झाली आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

यानिमित्त रिया परदेशी हिचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा येथे रिया परदेशी ही शिक्षण घेत आहे. राष्ट्रीय सेवा योजना विभागातून तिची निवड झाली आहे. दि. 1 जानेवारी 2024 पासून सुरू होणाऱ्या सराव शिबिरात ती सहभाग होणार आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून रिया परदेशीला मार्गदर्शन लाभले. तिच्या या निवडीबद्दल कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला. यावेळी कुलसचिव योगिनी घारे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे, परीक्षा विभागाचे प्रभारी संचालक डॉ. मलिक रोकडे आदी उपस्थित होते.

फोटो ओळी:
सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची विद्यार्थिनी रिया परदेशी हिची नवी दिल्लीतील प्रजासत्ताक दिन परेडसाठी निवड झाल्यानिमित्त तिचा कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी सत्कार केला. यावेळी कुलसचिव योगिनी घारे, एनएसएसचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे, विद्यार्थी विकासचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे, परीक्षा विभागाचे प्रभारी संचालक डॉ. मलिक रोकडे.

Related Articles

Back to top button