पोलीस

Breaking News : पोलीस अधिकाऱ्यांना हालवलं!

Solapur City Police Transfer Badali

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर : सोलापूर शहर पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांनी यासंदर्भातील आदेश काढला आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

विभाग क्रमांक एकचे सहाय्यक पोलीस आयुक्त संतोष गायकवाड यांची विशेष शाखा येथे बदली झाली आहे. विशेष शाखा येथील सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक तोरडमल यांची विभाग क्रमांक एक येथे बदली झाली आहे. शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार यांची विभाग क्रमांक दोन येथे बदली झाली आहे. विभाग क्रमांक दोनचे सहाय्यक पोलीस आयुक्त राजू मोरे यांची नियंत्रण कक्ष येथे बदली झाली आहे.

फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वनाथ सिद यांची महिला सुरक्षा विशेष कक्ष येथे बदली झाली आहे. जेलरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जाफर मोगल यांची विशेष शाखा येथे बदली झाली आहे. जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक मानसिंग खोर्चे यांची नियंत्रण कक्षेतून सलगर वस्ती पोलीस ठाणे येथे बदली करण्यात आली आहे.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बदल्या करण्यात आल्याची चर्चा आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची आणखी एक यादी येण्याची शक्यता आहे.

Police officer Santosh Gaikwad
Police officer Raju Mare
Police officer Vishwanath sid
Police officer Ashok toradmal
Police officer Rajendra Karankot
Police officer Jafar Mogal
Police officer Ajay Parmar

Related Articles

Back to top button